सौन्दड येथे कुणबी समाज मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम

0
28

सौन्दड,दि.२१:- सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे 20 जानेवारीला कुणबी समाजाच्या वतीने कुणबी समाज मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.गावातील महिला मंडळीं मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य मधुरीताई पाथोडे ,सरपंच गायत्रीताई इरले,ग्रा.प.सदस्य सुधाताई राऊत,रंजुताई भोई  सामाजिक कार्यकर्ता, महिला कुणबी समाज अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्या तथा गावातील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग दिला. या कार्यक्रमाचे आभार श्रीमती मेंढे यांनी मानले.