अनु.जमातीच्या प्रमाणपत्रासाठी गोवारी जमातीच्या लोकांनी सज्ज व्हावे : क्रिष्णा सर्पा

0
7
आदिवासी गोवारी समाजाची विचार-विमर्श सभा
गोंदिया,दि.४–  –    गोवारी हे मुळ चे आदिवासी आहेत . अनुसूचित जमातीच्या यादीसाठी तत्कालीन आमदार नारायण सिंह ऊईके यांनी गोवारी अशीच मागणी केली होती तर काका कालेलकर आयोगाने सुद्धा गोवारी अशीच शिफारस केली होती असतांना दुर्दैवाने अनुसूचित जमाती च्या यादीत ‘ गोंड गोवारी ‘ अशी संयुक्त नोंद आली आहे. त्यात दुरूस्ती करून गोवारी जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे  प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन करण्याठी आदिवासी गोवारी  जमातीच्या लोकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन क्रिष्णा सर्पा यांनी  केले.
 आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना जिल्हा शाखा गोंदिया वतीने आज गोंदिया येथील  गणेशन हॉल मध्ये आदिवासी गोवारी जमातीवरील अन्याय अत्याचार आणि शोषणाविरुद्ध    निर्णायक आंदोलनाबाबद विचार विमर्श करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते अध्यक्षस्थानावरून समाजबांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी  आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना चे अध्यक्ष क्रिष्णा शेरू सर्पा होते. उदघाटक म्हणून आदिवासी गोवारी जमातीचे जेष्ठ नेते गोकुळ बोपचे गोंदिया हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अध्यक्ष होमराज ठाकरे, डि.एम.राऊत गुरूजी, मुरलीधर मानकर, शिवलाल नेवारे, परसराम राऊत, प्रभाकर नेवारे, लक्ष्मीबाई आंबेडारे, मंदाताई बोपचे आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सभेत गोकुळ बोपचे, डि.एम. राऊत, होमराज ठाकरे, दामोदर नेवारे, मुरलीधर मानकर,  यांचे समयोचित मार्गदर्शन  केले.  प्रास्ताविक दामोदर नेवारे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर वाघाडे सचिव आदिवासी गोवारी मिशन तर आभार प्रदर्शन दिनेश कोहळे गुरूजी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.के.नेवारे, प्रकाश फुन्ने, पी.जी. शाहारे, गुरूदेव राऊत, अशोक बोपच, प्रकाश भोंडे, योगराज कोहळे, भुवनेश्वर ठाकरे, मनोज नेवारे, नंदुभाऊ सोनवाने, नंदुभाऊ सोनवाने,  रूपचंद राऊत, पंकज आंबेडारे, राजु बोपचे यांनी अथक परिश्रम घेतले.