दोन हजार विद्याथ्र्यांनी रेखाटली चित्र

0
15

गोंदिया,दि.१२ : बाल व युवा चित्रकारांच्या चित्रकलेला वाढविण्याच्या दृष्टीने व कला क्षेत्रात जागृ्रती आणता यावी यासाठी येथील हंसवाहिनी डेव्हलपमेंट ऑफ आर्ट एंड कल्चर सोसायटीच्या वतीने ४ फेबु्रवारी रोजी स्थानिक सुभाष बागेत आर्ट प्वाईंट मेगा स्पॉट पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये २ हजार स्पर्धकांनी चित्ररेखाटून या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
सोसायटीच्या वतीने दरवर्षीनुसार यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नि:शुल्क घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या वर्गातील मुलांपासून ते १२ व्या वर्गापर्यंच्या विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विद्याथ्र्यांना जल, तुळशीचे महत्व, नगर सुंदरता, भारतीय खेळांचे विद्यार्थी जीवनात महत्व, देशप्रेम व देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या दृष्टीने प्रकृती पर्यावरणाशर जुडलेल्या विषयांचे महत्व विशद करण्यासाठी सोसायटीच्या वतीने हे आयोजन करण्यात येत असल्याचे आर्ट पाईंटचे निर्देशक अरुण नशीने यांनी सांगितले. कार्यक्रमात मनोहर म्युन्सिपल शाळेचे शिक्षक उमाशंकर गर्ग, डॉ. प्रशांत कटरे, डॉ. प्रीती कटरे यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत भाग घेणाक्तया विद्याथ्र्यांपैकी विजयी विद्याथ्र्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये गु्रप ए जुनीयर मधून प्रथम मोहित खंडेलवाल, द्वितीय निशा खान, तृतीय यशस्वी रहांगडाले, गु्रप ए सिनीयर प्रथम त्रिशा दलाल, द्वितीय नैतिक कारंजेकर, तृतिय चित्रांश भोयर तर गु्रप बी मधून प्रथम अनुष्का पालेवार, द्वितीय महिमा लिल्हारे, तृतीय श्रावणी मोरघडे, सांत्वना पुरस्कार चैतन्य डहाके, गु्रप सी- प्रथम अरमान डोंगरे, द्वितीय अनुष्का कटरे, तृतीय मुग्धा झा, सांत्वना पुरस्कार छाया ढगे, गु्रप डी- प्रथम वैभव मेश्राम, द्वितीय बालचंद राऊत, तृतीय निकीता बघेल यांना प्रमाण पत्र देवून संम्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्याथ्र्यांना त्यांच्या शाळेतून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल चव्हाण, गिरीश गायधने, उमेश ठाकूर, अनिल शाह, जितेंद्र शाहू आदींनी सहकार्य केले.