Home विदर्भ विद्यार्थ्याच्या समयसुचकतेने वणवा आटोक्यात; शाळेची इमारत सुरक्षित

विद्यार्थ्याच्या समयसुचकतेने वणवा आटोक्यात; शाळेची इमारत सुरक्षित

0

गडचिरोली(अशोक दुर्गम) दि.२९: : जिल्ह्यातल्या रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमागे ठेवण्यात आलेल्या जळाऊ लाकडांना वणव्याच्या रुपात लागलेल्या आगीला तत्परता दाखवित शाळेतील विद्यार्थ्यांनी विझविल्याने शाळेच्या इमारतीला आगीपासून वाचविण्यात त्यांना यश आले. ही घटना आज गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
ही आश्रमशाळा गावाच्या एका बाजूला व जंगलाच्या अगदी जवळ आहे. गुरुवारी दुपारी जंगल व शेतात लागलेला वणवा पसरत पसरत येऊन शाळेच्या मागे ठेवलेल्या लाकडाच्या बिटाला लागला होता. ही गोष्ट लक्षात येताच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तात्काळ धाव घेऊन मिळेल तिथून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे दोन तासानंतर विद्यार्थ्यांनी ही आग विझवली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर शाळेच्या इमारतीलाही आग लागली असती.या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महाले, सरपंच केरामी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.

Exit mobile version