राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चंद्रपुरात बैठक

0
11

चंद्रपुर स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने स्थानिक श्रीलिला सभागृहात सोमवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा पार पडली. अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे, समन्यवक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, सहसचिव शरद वानखेडे, मार्गदर्शक बबनराव फंड, बबन वानखेडे, प्रा. रमेश पिसे, सुधाकर अडवाले, प्रा. अनिल qशदे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेत चंद्रपूर जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, कार्याध्यक्ष प्रा. बबन राजूरकर, उपाध्यक्ष डॉ. संजय बरडे, महासचिव विजय भालेकर, सहसचिव संजय टिकले, कोषाध्यक्ष प्रा. सुधीर चवरे, प्रसिद्ध प्रमुख प्रभाकर पारखी व सदस्य म्हणून दिनेश कष्टी, संजय सपाटे, ज्ञानेश्वर महाजन, कुणाल चहारे आदिचा समावेश आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली आहे. ओबीसी समाजाची जनगणना करुन केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, मंडल आयोग, निच्चीपन समिती आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करावी, ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेयर अट रद्द करावी, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिषयवृत्ती १०० टक्के देण्यात यावी, ओबीसी कर्मचाèयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, ओबीसींसाठी विधानसभा व लोकसभेसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावी, आqदसही ओबीसींच्या अन्य संवैधानिक न्याय मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सभेला उपस्थित असलेल्या पदााधिकाèयांनी उपस्थितांना शपथ दिली. सभेला जिल्ह्यातील बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.