Home विदर्भ मुरुमगावच्या बाजारातून नक्षल्यास अटक

मुरुमगावच्या बाजारातून नक्षल्यास अटक

0

गडचिरोली,दि.३: पोलिसांनी आज दुपारी धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील बाजारातून एका नक्षल्यास अटक केली. हरीश विठ्ठल पोटावी असे अटकेतील नक्षल्याचे नाव असून, तो प्लाटून क्रमांक ३ चा सदस्य आहे.पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले की, आज पोलिस मुरुमगावच्या बाजारात गस्त घालत असताना साध्या वेशभूषेतील तीन नक्षली बाजारात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला एकाने पोलिसांच्या दिशेने पिस्तोलमधून गोळीबार करुन पळ काढला. दुसरा नक्षलीही पसार झाला. मात्र हरीश पोटावी यास पकडण्यात पोलिसांना यश आले.

Exit mobile version