Home विदर्भ सौंदड पंस पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय भाजप तिसर्या क्रमांकावर

सौंदड पंस पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय भाजप तिसर्या क्रमांकावर

0

गोंदिया, दि.०७ ः-सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सौंदड गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसकडून ही जागा हिसकावत विजय मिळविला तर भारतीय जनता पक्षाला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजू शंकर डोंगरवार यांनी १९८६ मते घेत विजय मिळविला.त्यांनी काँग्रेसच्या वर्षा नंदकिशोर डोंगरवार यांचा पराभव केला.त्यांना १६७८ मते मिळाली.तर भाजपच्या माधुरी दोनोडे यांना १४४६मते,शिवसेनेच्या समिता इरले यांना ३१४ मते तर नोटा मध्ये ५६ मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी  मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हापरिषद गटनेता गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार,जिल्हा परिषद सदस्य रमेश चूर्हे,नगरसेवक देवचंद तरोणे, प्रभु लोहिया, एफ.आर.टी. शहा आदींनी विजयी उमेदवार मंजू डोंगरवार यांचे अभिनंदन केले.शिवसेनेच्या उमेदवारामुळे भाजपच्या उमेदवाराला दुसर्या क्रमांकावर येता आले नाही.

Exit mobile version