घोगरा,येरंडी व कुंभारटोली होणार धुरमुक्त गाव

0
10
गोंदिया,दि.१८:- धुरयुक्त चुलींमुळे स्वयंपाक करणाèया महिला व कूटुंबातील व्यक्तींना प्रदुषणाचा सामना करावा लागतो. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो ,धुरमूळे श्वसन विकार, दमा, खोकला, सर्दी व कर्करोगासारख्या गंभीर आजारांना बळी पडावे लागते. या बाबीकडे लक्ष देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत-सुंदर भारत, समृद्ध भारत या संकल्पनेला साकार करीत ग्राम स्वराज्य अभियानांतर्गंत २० एप्रिल रोजी प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील घोगरा,येरंडी व कुंभारटोली गावामध्ये एलपीजीचे वितरण करुन धुरमुक्त गाव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांनी पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेला एचपी कंपनीचे गोंदिया प्रमुख टांक तसेच गॅस एजंसीचे वितरक उपस्थित होते.
प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत जिल्हयातील ६४ हजार ९१५ लाभाथ्र्यांना गॅसचे वितरण करावयाचे असून ४९ हजार ३०४ गॅसचे कनेक्शन वितरीत करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे अतिमागास नक्षलग्रस्त असलेल्या मुरकुटडोह,दंडारी या गावामध्ये सुध्दा एलपीजी गॅसचे वितरण करण्यात येणार असून वरील तिन्ही गाव ५ मे पर्यंत धुरमुक्त गाव करण्याचा मानस असल्याची माहिती सवई यांनी दिली.तसेच जिल्ह्यात १७ गॅसवितरक असून ९ गॅसवितरक गोदिया शहरात आहेत.या सर्वांच्या माध्यमातून एलपीजी पंचायत दिवस २० एप्रिलला साजरा करावयाचा आहे.उज्वला गॅस योजनेसाठी जे निकष आहेत,त्या निकषामध्ये बसत नसलेल्या २४२ कुटुंबानाही गॅस कनेक्शन इतर योजनेतून दिले जाणार असल्याचे सांगितले.या एलपीजी पंचायत कार्यक्रमांतर्गत १०० कनेक्शन वितरीत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.