Home विदर्भ सावली बाजार समितीने दिला शेतक-यांना न्याय

सावली बाजार समितीने दिला शेतक-यांना न्याय

0

शेतक-यांकडून अशासकीय प्रशासक मंडळाचे अभिनंदन
सावली,दि.6ः-कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथील संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर जिल्हाचे पालकमंञी तथा वित्त, नियोजन व वनमंञी सुधीर मुनंगटीवार, सहकार मंञी सुभाष देशमुख, खा. अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांचे शिफारशीवरून महाराष्ट्र शासनाने बाजार समिती वर अविनाश पाल यांचे नेतृत्वात अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ति केली, या नियुक्त प्रशासक मंडळाने शासनाचा विश्वास सार्थ ठरवत शेतक-यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीत बाजार समितीची आवक वाढवुन बाजार समिती विषयी शेतक-यांत आपुलकी निर्माण करण्यात प्रशासक मंडळाला यश आले आहे.
यावर्षी तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना उत्पन्न कमी झाले त्यात धान्य व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करीत होते, त्यामुळे शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, मालाची किमंत स्वत: शेतकरी ठरवावा, तसेच तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात यावी तसेच सावली तालुक्याची धान्याची बाजारपेठ म्हणुन ओळख ह्वावी हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवुन समितीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल यांनी सर्व प्रशासक मंडळाला विश्वासात घेऊन सावली, व्याहाड खुर्द व पाथरी येथे दि. 07 डिसेबंर 2017 ला धान्य खरेदी विक्री बाजारपेठेचा शुभारंभ केला, शेतकरी आपला माल बाजारपेठेत आणावा म्हनुन बाजारपेठेचे महत्व पठवुन देत पुर्ण सावली तालुका पिजुंन काढला, अवैध खरेदी विक्री वर आळा बसावा म्हनुन भरारी पथकाची निर्मीती केली यामध्ये व्यापारी, अडते व शेतकरी यांच्या सहकार्याने बाजारपेठ सुरु झाली, या बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वजन मापे सक्तीचे करण्यात आले जेणेकरून शेतक-यांची लुट होनार नाही याची विशेष काळजी अशासकीय प्रशासक मंडळाने घेतली. या बाजारपेठेमुळे दुष्काळात शेतक-यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला सोबतच बाजार समितीची वार्षिक उलाढालीत मोठ्या प्रमानात केली, या बाजार समिती कडे शेतक-यांचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलण्यात अशासकीय प्रशासक मंडळाला यश आले त्यामुळे तालुक्यातील शेतकरी विद्यमान अशासकीय प्रशासक मंडळाचे अभिनंदन करत आहेत सोबतच या मंडळाला मुदत वाढ मिळाल्यास पुन्हा ख-या अर्थाने शेतक-यांना न्याय मिळेल आणि ही बाजार समिती शेतक-यांची राहील असा आशावाद तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहे.

Exit mobile version