Home विदर्भ रोपवनाच्या मजुरांची मजुरी हडप वनविभागातील प्रकार

रोपवनाच्या मजुरांची मजुरी हडप वनविभागातील प्रकार

0
मोहाडी(नितिन लिल्हारे) दि. ३: कांन्द्री वनपरिक्षेत्रातील आंधळगाव बिट मधील सालई खुर्द जंगलात१५ हेक्टर व टाकला शेत शिवारात १५ हेक्टर असे एकूण ३० हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवनाचे काम एप्रिल में २०१८ मध्ये कांन्द्री वन विभागाच्या वतीने करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र रोपवनात काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीची रक्कम अद्यापही मिळाली नाही. यासंदर्भात मजुरांनी आरफओ चकोले यांना तक्रार केली असूनही अजून पर्यत बँक खात्यात पैसे जमा झाले नाही.
सालई खुर्द जंगलात रोप वनासाठी १५ हेक्टर जागेत १६६६५ खड्डे मजुरांकडून खोद काम करण्यात आले. त्याच प्रकारे टाकला शेतशिवारात १५ हेक्टर जागेत १६६६५ खड्डे मजुरांकडून खोद काम केले.
मजुरांना डिड बाय डिड प्रति खड्डे २०.३६ पैसे मिळायला पाहिजे होते. परंतु अतिरिक्त मजुरांच्या नावाने खड्डे दाखवून खऱ्या मजुरांना १२-१३ रुपये खड्डे देण्यात आले. खड्याचे काम प्रत्येक मजुरांना प्रति दिवस १८ खड्डे २०.३६ पैसेशाच्या दराने खोदकाम करण्यास भाग पाडले.
मजुरकरांची ३६६ रूपये प्रतिदिवस या दराने हजेरीपटानुसार काम केले. मात्र या बिटरक्षक डी. ए. फटींग व क्षेत्र सहायकांनी ३० हेक्टर रोपवनाच्या सालई खुर्द व टाकला कामात हुंडा पद्धतीने प्रत्येकी कडून दोन तीन खड्डे जास्तीचे खोदकाम घेऊननही केवळ अर्ध्या पैशात मजुरांची फसवणूक केली.  त्यामुळे मजुरांना त्यांच्या श्रमाचा अत्यल्प मोबदला मिळाला. काही मजुरांना ५ ते ६ हजार रुपये कमी देण्यात आले व बोगस मजुरांच्या नावाने पैशा टाकून आर्थिक देवाण घेवाण करण्यात आले.  वनरक्षक फटींग यांनी हजेरी घेण्यासाठी एका व्यक्तीला ठेवून आपला स्वार्थ साध्य केला.
संकपाल दमाहे व त्यांची पत्नी अंतकला दमाहे दोघे मिळून ३६० खड्डे खोदकाम करण्यात आले एकूण ७३२९ रुपये पैकी फक्त १३०० रुपये बँक खात्यात जमा झाले. फिरतलाल ठाकरे यांनी सुद्दा जोडीवर २४४ खड्डे खोदकाम केले मात्र अर्धेच पैसे मिळाले. सुशीला लिल्हारे, सरादू लिल्हारे, जगत लिल्हारे,
शंकर गराडे, सुरजलाल सव्वालाखे, रमेश अठराहे असे गावातील १५० मजुरांची फसवणूक करण्यात आली आहे. भर उन्हात अधिकारी ऐशीच्या हव्यात मोज मस्ती करत होते त्यावेळेस मजुरांनी हाळ गाळ मोडून तोच घाम तोच पाणी पेत डिड बाय डिडचे खड्डे खोदकाम केले. भर उन्हात काम करूनही गरीबाच्या पोटावर वन विभाग लात मारत असेल तर हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. प्रति खड्डा २०.३६ पैशाने मिळेल असे आश्वासन देऊन १५० मजुरांचा शोषण करण्यात आले. काही मजुरांना अल्पदरात पैसे मिळाले तर काही मजुरांना मजुरी मिळालीच नाही. या दोन्ही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सालई खुर्द रोपवनाची नुकसान भरपाई जबाबदार कर्मचाऱ्यांकडून घेण्यात यावी व मजुरांना उरलेले पैसे तात्काळ देण्यात यावे.
या कामात वनरक्षक डी. ए. फटींग यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप तक्रारकर्त्या मजुरांनी केला आहे. वारंवार वनक्षेत्रधिकारी चकोले यांना सांगूनही झोपा काडत असल्याचे चित्र दिसत आहे. रोपवनातील कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून काम करणाऱ्या मजुराची मजुरी तत्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. या संदर्भात उपवनसंरक्षक वनविभाग नागपूर यांना तक्रार करण्यात येणार असल्याचे मजुरवर्गानी  सांगितले.

Exit mobile version