Home विदर्भ भंडारा जि.प.अध्यक्षाविरुध्द अविश्वासाच्या हालचाली?

भंडारा जि.प.अध्यक्षाविरुध्द अविश्वासाच्या हालचाली?

0

भंडारा,दि.30(विशेष प्रतिनिधी)ः-भंडारा जिल्हा परिषदेमध्ये जानेवारी महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होऊन अध्यक्षपदी लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांची निवड झाली.मात्र अवघ्या सात आठ महिन्याच्या काळातच जि.प.अध्यक्ष डोंगरे यांच्याविरुध्द दोन्ही काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यामध्ये असंतोष उफाळून येऊ लागला आहे.जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलेली कामे होत नाही,सभापतींचेही अध्यक्ष एैकत नाही.तर अध्यक्ष डोंगरे हे स्वमर्जीनेच काम करीत असल्याची टिका जिल्हा परिषद सदस्य करु लागले आहेत.या सर्व त्रासामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्याविरुध्द काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नाराज सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करता येईल का यासाठी चाचपणी सुरु केली असून भाजपसह विरोधी पक्षाच्या सदस्यांसोबतही याबाबत चर्चा सुरु केल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे एका माजी नेत्यांचा मोठा हस्तक्षेप होत असल्यानेही काही जिल्हा परिषद सदस्य नाराज असल्याची चर्चा आहे.डोंगरे यांच्याविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात नाराज सदस्य यशस्वी कितपत होतात की वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर गप्प बसतात याकडे नजरा लागल्या आहेत.जि.प.अध्यक्ष हे कंत्राट वाटपातही जिल्हा परिषद सदस्य व सभापतींनी विश्वासात घेत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात एैकायला मिळते.

Exit mobile version