Home विदर्भ काँग्रेसने गरिबांना सांभाळण्याचे काम केले

काँग्रेसने गरिबांना सांभाळण्याचे काम केले

0

गोंदिया,दि.08 : देशात काँग्रेसने मागील ७० वर्षात सर्व वर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या कित्येक योजना लागू केल्या. गोर-गरीब व समाजातील शेवटच्या टोकावरील नागरिकांसाठी लागू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या महत्त्वपूर्ण योजना कित्येकांना आधार देत असून त्या काँग्रेस सरकारचीच देण आहे. कॉँग्रेस पक्षाने गरिबांना सांभाळण्याचे काम केल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.या शिबिरात आमदार अग्रवाल यांनी अर्जदारांच्या समस्या ऐकून घेत त्यांना त्वरित सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी २५० हून अधिक अर्जदारांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करून माहिती घेतली. यात ७० उत्पन्नाचे दाखले, ४१ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, ३३ रेशनकार्ड, १३ मतदानकार्ड अर्ज होते. तर ३५ प्रमाणपत्र शासकीय चिकीत्सकांनी तयार करून दिले.

तालुक्यातील ग्राम पांढराबोडी येथे रविवारी (दि.६) आयोजित वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, सन २०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनांचे अनुदान वाढवून १ हजार रूपये करण्याची घोषणा केली होती. आता मात्र ५ वर्षे होत असून कॉँग्रेस शासनकाळात मिळत असलेले दरमह ६०० रूपयेच आजही मिळत आहे. त्याचही बहुतांश लाभार्थी या योजनांसाठी लागणारे कागदपत्र जुळविण्यातच असमर्थ ठरतात. अशातही या गरजूपर्यंत योजना पोहचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हे सामाजिक दायीत्व निभाविण्याचे काम प्राधान्याने करावे असे मत व्यक्त केले. उपसरपंच धुरन सुलाखे यांनी, प्रत्येकापर्यंत वैयक्तीक लाभाच्या योजना पोहचविण्यासाठी आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पूर्ण ताकतीने कार्य केले जाणार असल्याचे मत व्यक्त केले.

शिबिरात जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, रमेश लिल्हारे, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मंगल सुलाखे, भवरलाल रहांगडाले, राजु गौतम, भूवन नागपुरे, प्रेम मेश्राम, डॉ. योगेश बिसेन, भोजराज चुलपार, प्रमिला करचाल, धुरनलाल सुलाखे, चंद्रकला वघारे, आदर्श गजभिये, लता चन्ने, चंदन गजभिये, भवन नागपुरे, जितेंद्र ढोमणे, कविता मेश्राम, सिमा साखरे, पारबता दमाहे, मुनेश्वरी कवास, नेमीेचंद ढेकवार व गावकरी उपस्थित होते.

Exit mobile version