जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष जनजागृती कार्यक्रम

0
14

जिल्हा न्यायाधीश त्रिवेदी यांनी केली प्रत्यक्ष मतदान तपासणी
जनजागृती मोहिमेत 21935 नागरीकांनी घेतला सहभाग

गोंदिया, दि. 09: भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे जिल्हयात सामान्य मतदारांपर्यंत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम पोहोचविण्यासाठी दि. 28/12/2018 पासून जनजागृती कार्यक्रम सूरु आहे. टप्या-टप्यातून विविध घटकांपर्यंत या कार्यक्रमच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया येथे दि. 7 जानेवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. त्रिवेदी यांनी प्रत्यक्ष मतदान करुन मतप्रक्रियाचे अवलोकन केले. तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयी मनातील शंका व्यक्त करुन होणाऱ्या परिणामाबद्दल जाणून घेतले.
या वेळेस प्रामुख्याने जिल्हा न्यायाधिश-1 माधुरी आनंद, न्यायाधिश एम.वि. दुधे, आर.एम. कुर्वे, वाय.के. पुरी, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, विधी अधिकारी मिलिंद चौरे, मंडळ अधिकारी बी.डी. भेंडारकर व चमू उपस्थित होती. या ठिकाणी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती अंतर्गत प्रत्यक्ष तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सदर तपासणी कार्यक्रमात उपस्थितांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली संदर्भात तसेच उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन अपर तहसिलदार के.डी मेश्राम यांनी केले. सदर जनजागृती कार्यक्रमात न्यायाधिश,अधिवक्ता,अधिकारी,कर्मचारी यांनी मतदान करुन ईव्हीएमच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला. जिल्हा स्तरावरील पथकांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल प्रत्यक्ष मतदान करुन माहिती दिली. या वेळेस झालेल्या मतदान व मतदानाच्या पावत्या सर्वांसमक्ष मोजणी करुन दाखविण्यात आले. तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅटची कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची शंका-समाधान करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचा लाभ 21935 नागरीकांनी घेतला असून जानेवारी महिन्यापर्यंत सदर जनजागृती मोहिम चालणार आहे.