बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडित

0
31
सालेकसा(पराग कटरे),दि.03ः- तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय दुरसंचार विभागाच्या कार्यालयाचा विज पुरवठा बिलाचा भरणा न केल्याने 29 जानेवारीला विज वितरण विभागाने खंडीत केल्याने बीएसएनएलच्या सेवेवर परिणाम पडला आहे.शासकीय कार्यालयासह व्यवसायीकांचा ऑनलाइन कारभार ठप्प पडला आहे. मागील तीन महिन्यापासून बीएसएनएल कार्यालयाने विज बिल न भरल्याने 93,000/ हजार रुपये विजेचे बिल थकित झाले.त्यामुळे विज वितरण विभागाकडून विज खंडित करण्याची कार्यवाही करण्यात आल्याने  तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, शाळा महाविद्यालय अश्या विविध शासकीय तसेच व्यवसायीक प्रतिष्ठानाना मोठा फ़टका बसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या संबंधात बीएसएनएल आमगांव उपविभागाचे जूनियर टेलीकॉम अधिकारी विजय मुराले यांना विचारना केली असता विज बिलाचा निधी न आल्याने विज बिल भरणा करू शकलो नाही. निधी येताच विज बिल भरणा करू अशी माहिती दिली.