40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता 14 तंबाखु विक्रेत्यावर कारवाई

14 तंबाखु विक्रेत्यावर कारवाई

0
24

गोंदिया,दि.03ः-बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणार्‍या १४ तंबाखू विक्रेत्यांना तंबाखू नियंत्रण पथकाने २५ जानेवारीला दणका दिला. पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्तवतीने करण्यात आलेल्या गोरेगाव येथील या कारवाईत पथकने तंबाखू विक्रेत्यांना २८00 रुपयांचा दंड ठोठावला.कोटपा कायदा २00३ अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी असून तंबाखूजन्य पदार्थ विकी्र करणे हा सुद्धा दंडनीय गुन्हा ठरतो. असे असतानाही कायद्याचे उल्लंघन करुन पदार्थांची विक्री सुरुच आहे. हीच बाब लक्षात घेत, तंबाखू, नियंत्रण पथकाने आरोग्य व पोलीस विभागाच्या संयुक्तवतीने २५ जानेवारी रोजी गोरेगाव येथील ठाणा रोड ते पोलीस स्टेशन मार्गावरील १४ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २८00 रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी डॉ. शैलेश कुकडे, सुरेखा मेश्राम, संध्या शंभरकर, आर. डब्ल्यू. अिलगाम, हवालदार एस.के. भोयर उपस्थित होते.