सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचार्यांंचा सत्कार

0
39

गोंदिया,दि.03 : स्थानिक पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या सभागृहात ३१ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या अस्थाापनेवरील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाNयांचा सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला.कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक सोनाली कदम यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले पोलिस निरीक्षक वामन हेमणे, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर बघेले व आनंद येडे ,पोलीस हवालदार माधव बंसोड आदींचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोनि.दिनकर ठोसर,संतोष गेडाम,सपोनि जाधव, धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान श्रीमती कदम व ठोसर यांनी शरीर निरोगी राहण्यासाठी वैद्यकीय वीमा योजनेबद्दल नवीन उपाययोजना सांगीतल्या व उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचेसंचालन नापोशि राज वैद्य यांनी केले तर उपस्थितांचे आभार सपोनि धनवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवी संसाधन शाखेतील पोहवा मेश्राम,नापोशि वैद्य,डोंगरे व पोलीस मुख्यालयातील मेहर आदींंनी परिश्रम घेतले.