24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ ओबीसीचे हक्क गहाळ करणार्यांना सत्तेबाहेर काढू : बाळबुद्धे

ओबीसीचे हक्क गहाळ करणार्यांना सत्तेबाहेर काढू : बाळबुद्धे

0
39

गोंदिया,दि.03 : ओबीसी समाज हा देशातला सर्वात मोठा समाज आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ५२ टक्के आरक्षणाचे हक्कदार असल्याची नोंद घेतली व काँग्रेस
प्रणित शासनाच्या वेळी २७ टक्के आरक्षण देण्यात आले.मंडल कमिशन सिफारसी मुळे ओबीसी समाजाला न्याय देण्याचा काम केले. पण वर्तमान शासनकर्ते याची पायमल्ली
करण्याचे कट कारस्थान भारतीय जनता पार्टीचे सरकार करत आहे. राष्ट्रीय नेता शरद पवार, छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीचे अनेक प्रश्न
सोडविण्याचा प्रयत्न केला व पुढे ही ओबीसीचे संरक्षण करण्याचे कामाला शरद पवार यांच्यासह खासदार प्रपुâल्ल पटेल करणार आहेत. त्यामुळे ओबीसीचे हक्क गहाळ
करणाNयांना सत्तेबाहेरचा रस्ता दाखवा असे आवाहन राकाँ ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे गोंदिया जिल्ह्याच्या दौNयावर आले असता माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेवून संपूर्ण राज्यात वर्तमान
शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनजागृती निर्माण करण्यासाठी परिवर्तन यात्रा निघाल्यासंबधीत माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. आढावा बैठकीदरम्यान माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, प्रदेश सचिव विनोद हरीणखेडे, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, कृउबास सभापती रमेश ताराम, जि.प.सदस्य दुर्गाताई तिराले, डॉ.अविनाश काशिवार, प्रा.कमल बहेकार, केवल बघेले, प्रेम रहांगडाले, डॉ.अविनाश जायस्वाल, लोकपाल गहाणे, तुकाराम बोहरे, लक्ष्मण नागपुरे, सुभाष यावलकर, डुमेश चौरागडे, राकेश लंजे, प्रा.प्रमोद लांजेवार, राजु ठाकरे, संजय किंदरले आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा विस्तार करून गोंदिया तालुका उपाध्यक्षपदी देवचंद बिसेन, सियाराम मंडाले, नितीन टेंभरे यांची नियुक्ती
करण्यात आली व महासचिव पदी नरेंद्र चिखलोंडे, राजेश जमरे, डॉ.सुरेश कावडे, सचिवपदी सुरेंद्र पागोटे, धनंजय गुप्ता, जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाल तिराले, संजय दरवडे,
रमेश चुNहे, सुखराम फुंडे, अजय बिसेन, जिल्हा महिला उपाध्यक्षपदी उषा हर्षे, सहसचिव मायाताई निर्वाण, मंजुताई डोंगरवार, जयश्री फुंडकर यांना नियुक्त पत्र देण्यात
आले.कार्यक्रमात जि.प.सदस्य रजनी गौतम, तालुकाध्यक्ष सुनिल पटले, प्रदिप रोकडे, केतन तुरकर, जितेश टेंभरे,विनोद पटले, सी.के.बिसेन, अंचल गिरी, चंद्रकुमार चुटे,
आशिष नागपुरे, संजीव रॉय, देवचंद बिसेन, सियाराम मंडाले, सुनिल भांडारकर यांच्यासह राकाँचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

blank