Home विदर्भ पुरवठा विभागाच्या तालुका दक्षता समितीवर व्यापार्यांची निवड,बडोलेंचा आक्षेप

पुरवठा विभागाच्या तालुका दक्षता समितीवर व्यापार्यांची निवड,बडोलेंचा आक्षेप

0

सडक अर्जुनी,दि.05 : तालुका पातळीवर तहसील कार्यालयामार्फत चालविण्यात येणार्या वितरण प्रणालीत भ्रष्टाचार होऊ नये तसेच कामकाज योग्यप्रकारे चालावे या अनुषंगाने तालुका दक्षता समिती तयार केली जाते. या समितीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात येते. निवड जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. त्यानुरुप सडक अर्जुनी येथील तालुका पातळीवरील दक्षता समितीवर अनुसूचित जातीचे प्रतिनिधी या प्रवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार रोशन खुशाल बडोले यांची करण्यात आली आहे. सदर निवड
ही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली असून ही निवड राजकीय हेतूने करण्यात आली असून अशासकीय कमिटीचे सदस्यत्त्व स्वीकारण्यास नकार दिला असून झालेली निवड त्वरित रद्द
करण्याची मागणी रोशन बडोले यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत
करण्यात येणार्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवर दक्षता समिती गठीत केली जाते. त्यानुरुप शासन निर्णय क्र. दक्षता १००७/प्र.क्र.४५८/नापु २१ दि. २३ जानेवारी
२००८ नुसार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका दक्षता समितीवर अनुसूचित जातीचे प्रतिनिधी या प्रवर्गातून सदस्य पदावर रोशन खुशाल बडोले यांची निवड करण्यात आली आहे. मात्र,
ही निवड ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली असून राजकीय हेतूने करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. या कमिटीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेले हे स्वत: केरोसीन व लिंकर
सप्लायर असल्याने व्यापारी व्यक्तीची व माझ्यापेक्षा दुय्यम असलेल्या कार्यकत्र्याची निवड झाल्याचे समजून येत असून अध्यक्ष निवडीत माझा तीव्र आक्षेप असून माझ्यापेक्षा दुय्यम कार्यकत्र्याच्या
अध्यक्षतेखाली कमिटीमध्ये काम करणे मला शक्य नाही. त्यामुळे अशासकीय दक्षता समितीवर झालेली निवड तात्काळ रद्द करण्याची विनंती रोशन बडोले यांनी केली आहे.

Exit mobile version