Home विदर्भ स्मशानभूमीत सोयी-सुविधांची वानवा

स्मशानभूमीत सोयी-सुविधांची वानवा

0

सालेकसा,दि.23 : आमगाव (खुर्द) येथील स्मशानभूमीचा मोक्षधाम सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी कायापालट केला. परंतु, येथे प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, त्याचा वापर होत नसल्याने स्मशानभूमीपर्यंत जनसुविधा योजना पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. येथील स्मशानभूमीत शोकसभा घेण्यासाठी तसेच नागरिकांना थांबण्यासाठी सभामंडप नाही. त्यामुळे ऊन, पावसातच कार्यक्रम आटोपावा लागतो. स्मशानभूतीत शेडसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सुरक्षा भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा संचार असतो. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. स्मशानभूतीत शेड, पाण्याची सुविधा, सभागृह, पुरेशा विद्युत प्रकाशाची सोय नसल्याने गैरसोय होत आहे. दोन वर्षापासून मोक्षधाम परिसरात साप्ताहिक श्रमदान करून मोक्षधाम सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी परिसराचा कायापालट केला. परंतु, अजून काही सोयीसुविधांचा अभाव आहे. संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पेयजल, सभामंडपाचे काम करून सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन नगरपंचायत प्रशासन अधिकारी वाघमारे यांना सोपविण्यात आले. यावेळी समितीचे संदीप दुबे, सुनील असाटी, अरूण तावडे, अनिल अग्रवाल, मनीष असाटी, बबलू टेंभरे, काशी पाथोडे, अजय नागवंशी उपस्थित होते..

Exit mobile version