
गोंदिया,दि.29ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टि शिवसेना युतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचाराकरीता गोंदिया विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वात प्रचाराला सुरवात झाली आहे.त्यापुर्वी युतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांनी शिवसेनाप्रमुख मुकेश शिवहरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवारसह इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर मध्यप्रदेशचे माजी मंत्री व आमदार गौरीशंकर बिसेन यांच्यासोबतही शिवहरे यांनी युतीवर चर्चा करुन उमेदवाराला अधिकाधिक समर्थन मिळविण्याची ग्वाही दिली.शिवसेनेच्यावतीने मतदारसंघातील आंभोरा,कासा,डांगोर्ली याठिकाणी सभा घेऊन व कार्यालयाचा शुभारंभ करुन युती उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली.