ट्रक्टर देतोय सर्वसामान्यांना रोजगार-इंजि.पटले

0
25

साकोली,दि.२९ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार इंजि.राजेंद्र पटले यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली असून आज साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.कार्यकर्ते,पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांशी सवांद साधतांना आपल्याला मिळालेला निवडणुक चिन्ह हा ट्रक्टर आहे.आणि ट्रक्टर सर्वांना रोजगार देणारा आहे.शेतीच्या कामात असो की,रेती,गिट्टी,बजरीसह विटाची वाहतूक करायची असेल तर ट्रक्टरचीच गरज भासते आणि या ट्रक्टरच्या माध्यमातून कामगाराच्या कुटुबांच्या रोजगाराची तर मालकाला व्यवसायाची संधी मिळत असल्याचे विचार व्यक्त करीत सर्वसामान्य,शेतकरी,शेतमजुर,बेरोजगार युवक महिलांच्या हक्कासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे विचार त्यांनी मांडले.ही निवडणूक धनाढ्य पक्षाच्या उमेदवारासोबत लढत आहोत असे सांगत शेतकèयाच्या धानाला हमीभावासोबतच स्वामीनाथन आयोगानुसार मोबदला मिळावा,पेंशन मिळावी,युवकांच्या हाताला रोजगारासाठी उद्योग यावे आदी मुद्याला घेऊन आपण लढा देणार असल्याचेही पटले यांनी सांगत निवडणुकीत ट्रक्टर चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.