जिल्हा परिषद, पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत ४ एप्रिलला

0
14

गोंदिया/भंडारा : जिल्ह्यात नगरपंचायतींची घोषणा झाल्याने जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात निर्वाचन गणाच्या रचनांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार ही सोडत ४ एप्रिलला काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी गोंदियाकडून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाला. वस्तुस्थिती व प्रभाग रचनेच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची त्यांची विनंती विचारात घेऊन भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेची टप्प्यावरील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सुधारित कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार ३१ मार्चला विभागीय आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देणे, ४ एप्रिलला जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिलांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल.
जिल्हा परिषदेची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीची तालुक्याच्या तहसीलदारांच्या कक्षात काढण्यात येईल. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. निवडणूकीत हमखास निवडून येण्याचा दावा करीत आहे.

सोनी होणार अजासाठी राखीव,गुड्डू बोपचे,सीता रहांगडालेंचा पत्ता कट
गोरेगाव तालुक्यात बोपचेचे राजकीय वचर्स्व संपुष्ठात आणण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी सोनी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये घोटी गावाचा समावेश करण्यासाठी केलेला आटापिटा महत्वाचा ठरला.कुठल्याही परिस्थितीत डाॅ.बोपचे यांचीच विधानसभेसारखीच सोनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या मुलाची निवडणुक लढविण्याच्या इच्छेला ब्रेक देण्यासाठी घोटी हे गाव सोनी जिल्हा परिषद क्षेत्रात गेल्यास हा मतदारसंघ ओबीसी किवा ओपन साठी न राहता तो अनु.जाती साठी आरक्षीत होईल आणि यासोबतच बोपचेसह सीताबाई रहांगडाले यांचा सुध्दा पत्ता कट होईल हा डाव रचण्यात भाजपचे नेते यशस्वी झाले आहेत.यामध्ये एका माजी आमदाराचा व विद्यमान जि.प.सदस्याचा समावेश असल्याची चर्चा असून एका मंत्र्याने सुध्दा त्यांना मदत केल्याचे बोलले जात आहे.