Home विदर्भ सिंटेक्स टॅंकमध्ये अडकलेल्या कासवांना जिवदान

सिंटेक्स टॅंकमध्ये अडकलेल्या कासवांना जिवदान

0
गोंदिया,दि.02ः- गोंदिया वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या एका भागातील सिन्टेक्स टॅंकमध्ये पाच ते सहा कासवांना ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सुशिल नांदवटे यांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्या कासवांना सुखरुप बाहेर काढत जंगलात सोडले.गोंदिया वनपरिक्षेत्रातंर्गत 1 ऑगस्ट रोजी गुप्तहेराकडून एका सिन्टेंक्सटॅंकमध्ये कासव अडकल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नांदवटे यांनी सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र शेंडे यांना माहिती देत वन कर्मचारी आणि फिरते पथक गोंदिया क्रमांक एकच्या वनपरिक्षेत्राधिकारी स्नेहल मस्कर  यांच्यासह घटनास्थळ गाठले.तेव्हा तिथे असलेल्या सिन्टेंक्स टॅंकमध्ये पाच ते सहा कासव आढळून आले,विचारणा केल्यावर अज्ञात व्यक्तीने टाकल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी व्यक्तकेला.त्या कासवांना बाहेर काढून जीवनदान देत  नैसर्गिक वास्तव्यामध्ये पंचनामा करून सोडण्यात आले.

Exit mobile version