काचेवानी सेवासहकारी सोसायटी अध्यक्षावर गैरव्यवहाराचा आरोप

0
8

गोंदिया-तिरोडा तालुक्यातील काचेवानी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उमाशंकर चौधरी यांनी अनेक शेतकèयांच्या कर्जप्रकरणात त्यांची फसवणूक करून संस्थेच्या कारभारात गैरव्यवहार केल्याचा आरोप लवंगदास मंडारी यांच्यासह २० ते ३० शेतकèयांनी लेखी स्वरूपात केला आहे.याप्रकरणाची तक्रार तिरोडा तालुका उपनिबंधकाकडे १६ जानेवारीला सादर करूनही त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मडांरी यांच्या तक्रारीनुसार चौधरी यांनी अध्यक्षपदी राहत असतानाच शेतकèयाच्या नावावर कर्ज काढले.आणि त्यांच्या नावावर थकबाकी दाखविण्याचे काम केले आहे.हा प्रकार २००१ पासून २०१४ पर्यंतंचा असल्याचेही म्हटले आहे.२००९-१३ मध्ये कर्ज वसुलीचे एकही नोटीस संबधित शेतकèयांना पाठविले नाही.याप्रकरणात अंधारात ठेवून ऑक्टोंबर २०१४ चे वसुली नोटीस फेबुवारी २०१५ ला शेतकèयांना पाठविले तेव्हा आपल्यावर कर्ज असल्याची जाणीव झाली.कर्जाची रक्कम बघताच काही शेतकèयांना आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले.संबधित शेतकèयांनी जेव्हा सदर प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष व सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्हाला जे काही करायचे करा,तुमच्या घरात शिरून वसुली करू अशी धमकी दिल्याचा आरोप शेतकèयांनी तक्रारीत केला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल क़रण्याच्या मागणीचे पत्र,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,जिल्हा उपनिबंधक व तिरोड्याचे पोलीस निरीक्षक यांनाही तक्रारकत्र्यांनी सादर केले आहे.