31.3 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता – प्रताप वाघमारे

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता – प्रताप वाघमारे

0
129

नागपूर,दि.24 :-शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे.त्यांना आपण डोक्यावर घेण्या सोबतच आपल्या डोक्यातही घेतले पाहिजे.त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील वावर व योगदान हे अतुलणीय आहे.महाराजांनी दिलेले “गामीनीकावा ” युद्धतंत्र हे सैनिक क्षेत्राला दिलेले अत्यंत महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या “रयतेचे राज्य” संकल्पेतूनच भारताच्या संवीधानात “कल्याणकारी राज्य” ही संकल्पना तय्यार झाली आहे.शासन कसे चाललवावे हे अनेक राजांना त्यांनी आदर्श घालून दिला सैन्य मोहिमेवर निघालास त्यांनी सदवर्तन ठेवावे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करू नये.लागणारे धान्य सरपनाचे लाकूड हे शेतकऱ्या कडून विकतच घ्यावे.त्यांच्या देठालाही हात लावू नये.इतपत विचार करणारा हा थोर राजा होता.त्यांनी महिलांचा आदर करण्याचा आपला आदर्श जगाला दिल्याचे विचार तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी व्यक्त केले.ते हिंगणा तालुक्यातील एका छोट्याशा गिरोला गावात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला रामराव वानखेडे,तहसीलदार प्रताप वाघमारे, सेवानिवृत्त कृषी विभाग अधिकारी रोकडे,नाना सातपुते, माजी सरपंच मधूकर काथोटे,कृष्णा डाफ उफस्थित होते.या प्रसंगी पाहुण्याच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सुभेदाराची सून पाहून आमची आई जर इतकी सुंदर असती तर आम्हीही इतकेच सुंदर असतो. असे म्हणणारा हा राजा आज आम्हाला आवश्यक आहे. “मातृभक्ती व मातृभूमी सेवा ” हे त्यांचे गुण आज आम्हाला अभिप्रेरीत करतात अठरापगड जातींना सोबत घेऊन आपले सैन्य उभारणारा हा राजा कधीच जातीवादी मानसिकता आमच्यात रुजू देत नाही पण शिवाजी महाराजांना विशिष्ठ जाती,धर्म यात अडकउन ठेऊन आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुजे करीत असल्याची खंतही व्यक्त केली. गावातील युवकांनी महाराजांची व कुण्याही महापुरुषांची जयंती व अत्यंत उपक्रम शिलतेने राबवावी गावात आवश्यक त्या सुविधा श्रमदानातून उभाराव्यात.गावातील समाज मंदिर पडून राहते त्या करीता एक ठराव घेऊन त्या समाज मंदिराचे अभ्यासिकेत रूपांतर करावे व तेथे गावातील सर्व विध्यार्थ्यांना अभ्यासास बसवावे त्यामुळे गावात समूह शक्तीतून विकास साधता येईल असेही म्हणाले.अन्य मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सतीश फोफसे,आशिष मांगे,संदीप मने,अमित मने,राहुल डाफ, आशिष गुबे, चेतन थेटे, रोशन मांगे,शुभम मने, स्वप्निल मने आदींनी केले.