31.3 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ देवरी नपच्या मुख्याधिकारीपदी अजय पाटणकर रुजू

देवरी नपच्या मुख्याधिकारीपदी अजय पाटणकर रुजू

0
515
देवरी,दि. 24 – देवरी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार आज सोमवारी (दि.24) अजय राजेंद्र पाटणकर यांनी स्वीकारला आहे.
देवरी नगर पंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांची लाखनीचे मुख्याधिकारी म्हणून स्थानांतर झाल्याने देवरीचे मुख्याधिकारी पद हे रिक्त झाले होते. यामुळे देवरी नगरपंचायतीची प्रशासकीय जबाबदारी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे होती. बऱ्याच दिवसांपासून नियमित मुख्याधिकारी पदाच्या प्रतिक्षेत देवरीकर होते.
तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या कामाच्या धडाक्याने देवरीकर चांगलेच परिचित होते. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री पाटणकर यांचेकडून सुद्धा नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. विशेषतः रस्त्यावरील अतिक्रमण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, रोशनाई आणि सुरळित वाहतुक आदी बाबींची नागरिक त्यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहे.