नागपूर,दि.04ः- सकाळी नागपूरवरून पेसेंजरनी येणारे व सायंकाळी ४ च्या आत अपूर्ण काम करता दक्षिण एक्सप्रेसने परत जाणार्या अधिकार्यांसह कर्मचार्यांवर दक्ष डोळा ठेऊन त्यांना आपल्या कार्यशैलीचा अभ्यास करून कमीत कमी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पयर्ंत शासकीय कामगिरी बजावणे गरजेचे आहे. कारण, महाराष्ट्र शासनाने सहा दिवसांऐवजी केवळ पाच दिवसांचा निर्गमित कर्मचार्यांसाठी आठवडा केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जनतादरबारात सर्व अधिकार्यांचे कान टोचून, संबंधित अधिकार्यांना खडसाविले.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पहिल्यांदाच नरखेड नगरीत पदार्पण झाले असता, सर्व जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष अभिजीत गुप्ता, उपाध्यक्ष अजय बालपांडे, पं. स. सभापती निलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जि. प. सदस्य पूनम जोध, देवका बोडखे, पं. स. सदस्य रश्मी आरघोडे, अरुणा मोवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मिळालेल्या तक्रारीनुसार नरखेड तालुक्यात कर्मचारी पथकाचा फतवा निर्माण करून हे कर्मचारी स्वत:च्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी मिळणार्या वेतनातील सर्व पैशांची उधळण नागपुरात करतात. त्यामुळे नरखेड तालुक्यातील बाजारपेठा पूर्णत: ओस पडल्याची व्यापार्यांमध्ये सर्वत्र ओरड आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा तक्रारीनिशी संबंधित अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय अवैध दारूविक्रेते (शासकीय सोडून) व सावकारांची ७ मार्चच्या नंतर गय केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश संबंधित पोलिस अधिकार्यांना दिले.
अवैध दारूबंदीबद्दल बोलताना ना.अनिल देशमुखांनी पुरुष मंडळींकडून कोणताही आवाज निघाला नाही, पण महिलांनी दारूबंदी ही झालीच पाहिजे, असा नारा दिला असता,संबंधित पोलिस अधिकार्यांना व अवैध दारूविक्रेत्यांना आगामी ७ मार्चपयर्ंत पोलिस अधीक्षक (ग्रामीण) काटोल मुक्कामी आल्यानंतर मी कोणाचीही गय करणार नाही, तोपयर्ंत तुम्हाला काय करायच आहे ते करा असे म्हणाले.
याशिवाय अवैध सावकारी करणारे गरजू व्यक्तींकडून महागड्या वस्तू व मालमत्ता अल्पशा पैशांवर गहाण ठेऊन त्यांना जर लुबाडत असेल, तर सगळ्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार द्यावी, संबधित अवैध सावकारांना मुद्दल व व्याजांसह गरजू व्यक्तींनी निर्भयपणे वागण्याची हमी दिली