Home विदर्भ जगत महाविद्यालयात महिलांच्या आरोग्यविषयक  व कायदेविषयक बाबीवर कार्यशाळा

जगत महाविद्यालयात महिलांच्या आरोग्यविषयक  व कायदेविषयक बाबीवर कार्यशाळा

0

गोरेगाव,दि.४:-स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथील आजिवन अध्ययन  सेवा केंद्र व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींना  आरोग्यविषयक व कायदेविषयक बाबीवर उद्बबोधन व्हावे या करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन. वाय. लंजे तर प्रमुख वक्ता म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगावच्या डाॅ. सुषमा पटले,अॅड. पृथ्वीराज चव्हाण, अॅड.सुजाता तिवारी प्रमुख उपस्थितीत   व्यासपीठावर उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम, डाॅ. कु.एल. वाय. ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. डाॅ. सुषमा पटले यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

अॅड. पृथ्वीराज चव्हाण व अॅड. सुजाता तिवारी यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करतांना महिलांच्या सुरक्षीततेसाठी कोणकोणते  कायदे  आहेत? त्यांनी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ. एन. वाय. लंजे यांनी स्त्री ही समाजाची व कुटुंबाची खरी आधारस्तंभ आहे  आहे’ त्याकरीता ती सक्षम असणे महत्त्वाचे आहे.अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. या कार्यशाळेचे संचालन डाॅ.कु. एल. वाय. ढवळे व आभार उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम यांनी केले. या कार्यशाळेत बहुसंख्य विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version