जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर

0
386

गडचिरोली,दि.04 :  दिनांक 24 फेब्रुवारी, 2020 अन्वये माहे एप्रिल 2020 ते जुन 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत बेतकाठी, बोरी, मसेली, नवरगांव ,कोचीनारा, बिहिटेकला, टेमली, कोटगुल, अल्लीटोला, नांगपुर या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे.

तसेच निवडणूकीतील आरक्षित पदांकरीता संक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जात प्रमाणपत्र तसेच नामनिर्देशनपत्र सादर करत वेळी जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पोच व विहीत नमुण्यातील हमीपत्र जोडले असल्यास नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येईल.

     तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द दिनांक 27 फेब्रुवारी 2020, नामनिर्देशनपत्रे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक व वेळ दिनांक 6 मार्च 2020, ते दि. 13 मार्च 2020, सकाळी 11.00 ते दु. 3.00पर्यंत, ( दिनांक 8 मार्च 2020 चा रविवार व दिनांक 10 मार्च 2020 ची सार्व. सुट्टी वगळून) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ दिनांक 16 मार्च 2020 वेळ स.11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत , नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2020, दुपारी 3.00 वाजेपर्यंत , निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 मार्च 2020 दुपारी 3.00 वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 29 मार्च 2020 सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यत , मतमोजणीचा दिनांक  ( मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहिल)  दिनांक 30 मार्च 2020 तहसील कार्यालय, कोरची येथील सभागृह सकाळी 10.00 वाजल्यापासून संपेपर्यंत राहील.निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे आवाहन  कोरची  तहसिलदार  यांनी केले आहे.