40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home शैक्षणिक डीबीटी पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 8 मार्च

डीबीटी पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 8 मार्च

0
160

गडचिरोली,दि.4:- जिल्हयातील सर्व कनिष्ठ-वरीष्ठ व व्यवसायीक -बिगरव्यावसायीक,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना सुचित करण्यात येते की, सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित अनु.जाती, इमाव,विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांनी महाडिबीटी य ऑनलाईन प्रणालीवर भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज, ज्या महाविद्यालयांनी अद्यापही या कार्यालयाकडे मंजुरी करीता सादर केलेले नाहीत, त्यांना अर्ज फारवर्ड करण्याची अंतीम दिनांक 8 मार्च 2020 आहे.  महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहीत वेळेत अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. डिबीटी पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज फारवर्ड करण्याची दिनांक 8 मार्च  2020 अंतीम संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.