37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ गोंदिया जि.प.चा २३ कोटी रुपयाचा संभाव्य अंदाजपत्रक सादर

गोंदिया जि.प.चा २३ कोटी रुपयाचा संभाव्य अंदाजपत्रक सादर

0
501

गोंदिया,दि.०५ः- जिल्हा परिषदेचा सन २०१९-२०९ चा सुधारीत व २०२०-२१ चा २३ कोटी ४० लाख ६२ हजार २ रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी आज गुरूवारी (दि.५) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाèया निधी ८ लाख रुपये कायम ठेवण्यात आला.महिला बालकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि.५) दुपारी जि.प स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि.प.उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला. या वेळी सन २०१९-२० चा ३३ कोटी ८८ लाख २९ हजार १४५ रुपयांचा सुधारित तर सन २०२०-२१ चा २३ कोटी ४० लाख ६२ हजार रूपयांचा संभावित अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी ८ लाख रूपये करण्यात आला.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे वर्षातील उत्पन्न २०१९-२० च्या अर्थसंकल्पात १७ कोटी २९ लाख १५हजार ५८४ एवढे निर्धारीत करण्यात आले होते.ते मात्र सुधारित अर्थसंकल्पात ११ कोटी ५१ लाख २३ हजार ६४४ रुपयावरच थांबल्याने ६ कोटी वाढीव उत्पन्नाचे लक्ष जिल्हा परिषद पुर्ण करुन शकली नाही.तर संभाव्य २०२०-२१ संभाव्य उत्पन्न १५ कोटी ५४ लाख ३२ हजार निर्धारित करण्यात आले आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये पिण्याचे पाणी व शौचालयासाठी नविन लेखाशिर्ष तयार करुन १० लाखाची तसेच स्वयंसहाय्यता हायस्कुल(नविन लेखाशिर्ष) अंतर्गत १० लाखाची तरतुद ही शिक्षण विभागाला देय ५ टक्के निधीपेक्षा अधिक करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागाच्या विविध योजनासांठी ५८ लाख ४१ हजार तरतुद २० टक्केहिस्स्यानुसार करण्यात आली आहे.अपंगाना तीनचाकी सायकल,श्रवणयंत्र,संगणक प्रशिक्षण,दिव्यांग व्यक्तींना स्वयरोजगारासाठी अर्थसहाय्य अशाकरीता १४.५०लाख,महिला बालकल्याण विभागासाठी ३३ लाख,ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी ५८ लाख रुपयाची तरतूद व कृषी विभागासाठी ४३.४४ लाख रुपयाची तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर,काँग्रेसचे गटनेते पी.जी.कटरे,किशोर तरोणे,राजलक्ष्मी तुरकर,उषा मेंढे,सुरेश हर्षे,मनोज डोंगरे,राजेश भक्तीवर्ती आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
blankउत्पन्न वाढविण्याकडे दुर्लक्षासोबत,शिक्षण,आरोग्य व कृषीकडे दुर्लक्ष-किशोर तरोणे
गोंदिया जिल्हा परिषदेचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा चुकीच्या आकड्यावर सादर झालेला असून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कुठलीही तरतूद व नियोजन नसल्याची टिका सोबतच अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील कृषी,आरोग्य व शिक्षणावर दुर्लक्ष करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे बेरार टाईम्सकडे सांगितले.अर्थसभापती हे बांधकाम सभापती असल्याने त्यांनी अधिकाधिक निधी हा बांधकामाकडे वळते करुन इतर विभागावर अन्याय केल्याचे म्हटले आहे.राज्यशासनाचे नियम बाजुला सारत जिल्हा परिषद अधिनियमाला बाजुला सारण्यात आल्याचेही तरोणे यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना म्हटले आहे.