गोंदिया,दि.07 : स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारा संलग्नित बाई गंगाबाई स्त्री रूगणालयातील अधिसेविकाव्दारे रूग्णालयातील महिला कर्मचार्यांशी अपमानजनक वागणूक दिली जात आहे. यामुळे येथील महिला कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे.
सविस्तर असे की, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचा अर्धसेविकेतंर्गत डीएचएस व डीएमईआरच्या कर्मचार्यांचा समावेश आहे. यात अधिसेविकांना रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचार्यांची नियमित ड्युटी लावणे, कर्मचार्यांच्या सुट्ट्या मंजूर करणे आदि जबाबदारी दिली आहे. परंतु, येथील अधिसेविका आपल्या मर्जीतल्या कर्मचार्यांच्या सुट्ट्या अॅडजेस्ट करावेत, त्यांची ड्युटी स्पेशल वॉर्डात लावणे, प्रसुती रजा नियमित रजेचे सेटींग करणे आदि प्रकार घडतात इतर कर्मचार्यांना मात्र अपमानजनक वागणूक देत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिसेविका केवळ चार तास ड्युटी करतात या अधिसेविका नागपूर येथून इंटरसिटीने येतात व विदर्भ एक्स्रपेसने परत जातात. एंकदरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक याकडे डोळेझाक करीत असल्याने रूगणालयाचा कारभार ढिसाळ झाला आहे.