शास्त्री वॉर्डात दोन दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा

मजिप्राचे दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
167
गोंदिया,दि.17 : शहरातील प्रभाग क्र.२० येथील शास्त्री वॉर्ड येथील मागील दोन ते तीन दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. गढूळ पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात काही सुज्ञ नागरिकांनी वॉर्डाचे लोकप्रतिनिधी व मजिप्राच्या अधिकाºयांना माहिती दिली. मात्र, अद्यापही समस्येवर तोडगा काढण्यात मजिप्राचे अधिकारी, कर्मचाºयांना यश आले नाही.  त्यामुळे नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू आहे. अशात खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागु करून करण्यात आला आहे. त्यातल्यात्यात नागरिकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, शास्त्री वॉर्डात मागील दोन ते तीन दिवसांपासून दोन्ही वेळ दुषित पाणी पुरवठा होत आहे. आठ दिवसापूर्वी वॉर्डातील पाईप लाईन लिकेज झाली होती. नागरिकांनी याची सुचना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना माहिती दिली. यावर मजिप्रातर्फे पाईप लाईनची दुरूस्ती करण्यात आली. दरम्यान परिसरात दुषित व गढूळ पाणी पुरवठा सुरूच आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी गढूळ असल्याने पिण्यायोग्य नाही करीता नागरिक बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. याकडे लक्ष देवून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
…………………………….
गढूळ व दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा
शास्त्री वॉर्डात मागील दोन ते तीन दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत आहे. पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी बोरवेलकडे मोर्चा वळविला आहे.  तर दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्याने जलजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.