30.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ निवडणूक अधिसूचनाबाबत निवेदन व हरकती आमंत्रित

निवडणूक अधिसूचनाबाबत निवेदन व हरकती आमंत्रित

0
333

भंडारा,दि. 17 :- भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक 2020 संबंधाने जिल्हयाची निवडणूक विभागात विभागणी तसेच निर्वाचक गणामध्ये विभागणी, आरक्षण व क्षेत्राची व्याप्ती दर्शविणारी अधिसूचना 16 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा,  सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत समित्यांचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने जिल्हाधिकारी, भंडारा यांचेकडे 23 मार्च 2020 पर्यंत पोहचतील ती निवेदने, हरकती व सूचना विचारात घेतले जाईल. उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी  यांचेकडे आलेले निवेदन, हरकती व सूचना विचारात घेतले जाणार नाही. वरील कालावधीत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त, नागपूर  किंवा ते ज्या अधिकाऱ्यास अधिकार प्रदान करतील अशा अधिकाऱ्यांद्वारे 30 मार्च 2020 पर्यंत सूनावणी देऊन निर्णय देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी कळविले आहे.