गोंदिया,दि.18 : जगात कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली असून जिल्ह्यातील विदेशात राहत असलेले १७ जण स्वजिल्ह्यात दाखल झाले आहेत.त्यांची आरोग्य तपासणी करुन विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.सध्या विदेशातून देशातून परतणाऱ्यांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे.त्यानंतरही जिल्हापातळीवर तपासणी करुन नजर ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेला असल्याने जिल्ह्यातील त्या १७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १२, तिरोडा तालुक्यातील २, देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्तीचा समावेश आहे.१७ पैकी पाच कतार येथून ,अबूदाबी दोन, रशिया दोन, दुबई दोन, अमेरिका तीन, थायलंड दोन व इजिप्त येथून एक असे १७ जणांचा समावेश आहे. विदेशातून परतलेल्यांचीपैकी एकाने स्वत: नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रक्ताचे नमुने दिले.परंतु त्यांचाही रिर्पोट निगेटीव्ह आलेला आहे.उर्वरीत १५ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परंतु त्यांना कोरोनाची काहीच लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले असून विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आले आहे.





