36.3 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर स्थगित

शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर स्थगित

0
148

गोंदिया, दि. १9 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती
प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.
कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झालेली
असून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना
विषाणूचा प्रसार शासकीय कार्यालयांमध्ये होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक
उपाय म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सर्व विभाग, कार्यालयात येतेवेळी व
कार्यालय सोडतांना बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असणारी
हजेरी पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. शाखा प्रमुखाने
शाखेनिहाय हजेरीपट ठेवण्यात यावे व संबंधितांनी आपली उपस्थिती
पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदविण्याची कार्यवाही करावी. तसेच संबंधित
अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेवर किंवा आवश्यक असल्यास त्यावेळेवर
अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये
शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. बलकवडे यांनी दिलेल्या आदेशात
म्हटले आहे.