21 पासून साकोली उपविभागात  कलम 144

0
143

भंडारा,दि. 20 :- साकोली उपविभागात साकोली व लाखनी तालुक्यात विषाणूंच्या प्रादुर्भावास किंवा प्रचारास प्रतिबंध करण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित अधिसूचना व नियमावली मधील तरतूदीनुसार गर्दी टाळण्याकरीता सभा मेळावे,उपोषण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक  क्रिडा विषयक कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबत तसेच नगर पंचायत व नगर पालिका क्षेत्रालगतच्या जवळपास असलेल्या क्षेत्रातील सर्व रेस्टॉरेंट व बार, खानावळ, ढाबा यांची सायंकाळची बंद करण्याची वेळ कमी करणे,गर्दी नियंत्रित करणे यासाठी संबंधित ठिकाणी अनावश्यक गदीर्‍ टाळण्यासाठी साथरोग नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून स्थानिक परिस्थिती व निकड लक्षात घेवून उपाय योजना करणे आवश्यक असल्याने साकोली उपविभागात उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी 21 मार्च 2020 रोजी रात्री 12 वाजतापासून फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.

साकोली नगर परिषद व लाखनी नगर पंचायतीतील  हद्दीतील  मोठया प्रमाणात लोकांचा समुह जमू न देण्याकरीता मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. सदर  अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमुद आहे.