25.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हा परिषद ‘व्हॉटस अ‍ॅप’ वर स्विकारणार तक्रार, निवेदन

भंडारा जिल्हा परिषद ‘व्हॉटस अ‍ॅप’ वर स्विकारणार तक्रार, निवेदन

0
163

भंडारा,दि.20:- जिल्हयात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम घेऊन येणाèया नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘एक पाऊल पुढे‘ टाकले आहे. जिल्हा परिषदेमध्ये कामे घेऊन येणाèया नागरिकांना आता थेट येण्याची गरज राहणार नाही. याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने ९३५६४८८७२५ या क्रमांकाचा व्हॉटसअ‍ॅप कार्यान्वित केला असून यावर कार्यालयीन वेळेत मॅसेज येताच जिल्हा परिषद प्रशासन संबंधीत निवेदन-तक्रारकर्त्यास तासभरात फोन व्हॉटसअ‍ॅप द्वारे त्यांच्या तक्रार, निवेदनाबाबत समाधान करणार आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेत होणारी गर्दी कमी करता येणार असून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये न येता व्हॉटसअ‍ॅपद्वारे आपले तक्रार, निवेदन, माहिती अथवा आपले म्हणने मांडावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

कोरोना विषाणू कोव्हीड १९ या आजाराबाबत भंडारा जिल्हयात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही पुढाकार घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पाऊले उचलली आहेत. जिल्हाभरातील नागरिक विविध कामे घेऊन जिल्हा परिषदेच्या विविध विभागात येतात. संबंधीत विभागात जावून आपले काम करण्याचा प्रयत्न करतात. अडचण निर्माण झाल्यास संबंधीत विभाग प्रमुखास भेटूनआपल्या समस्येचे निराकरण करून घेतात. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये विविध विभागात नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असते.

परंतु देशभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणू भंडारा जिल्हयात संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने ९३५६४८८७२५ या क्रमांकाचा व्हॉटसअ‍ॅप कार्यान्वित केलेला आहे. सदर व्हॉटसअ‍ॅप वर जिल्हयातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागात असलेले काम कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात कळवायचे आहे. तसेच तक्रार किंवा माहिती असेल ती शेअर करून आपले समाधान करावयाचे आहे. सदर व्हॉटसअ‍ॅप गृपवर माहिती, तक्रार किंवा निवेदनाबाबत मॅसेज प्राप्त होताच जि.प. च्या विविध विभागांच्या अधिक्षकांच्या गृपवर हा मॅसेज फॉरवर्ड करून संबंधीत विभागाचेअधिक्षक त्यावर विभाग प्रमुखांशी चर्चा करून निराकरण करण्यासाठी कार्यवाही करणार आहेत.