धान खरेदीला महिनाभर मुदतवाढ द्या

0
224

भंडारा,दि.20: धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये शासकीय आधारभूत हमी भाव केंद्रावर सुरू असलेली धान खरेदीला महिनाभर मुदतवाढ देण्याची मागणी आ.नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना देण्यात आले. धानखरेदीला मुदतवाढ देण्याचा अधिकार केंद्र सरकारला असून राज्यसरकारमार्फत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसरचे आ.राजू कारेमोरे, आमगावचे आ.सहसराम कोरोटी आदी यावेळी उपस्थित होते. भंडारा – गोंदिया जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विक्रमी धानखरेदी झाली असली तरी धानखरेदी केंद्रावर नोंदनी झालेल्या पण धानाची मोजणी न झालेल्या शेतकNयांची संख्या मोठी आहे. अवकाळी पाऊस, खरेदी यंत्रणेतील अडथडे व बोनसच्या घोषणेमुळे शेतकNयांचा वाढलेला कल यामुळे हजारो क्विंटल धान शेतकNयांच्या घरात पडून आहे. शासनाच्या धोरणानुसार ३१ मार्च धान खरेदीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच प्रत्येक शेतकNयाचा धान खरेदी करता यावा यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आ.नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.