स्व. वसंतराव नाईक जयंती कृषी दिन म्हणून साजरी

Ø  जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले  स्व. नाईक यांना अभिवादन

0
518

भंडारा दि.2 (जिमाका): कृषि विभाग, जिल्हा परिषद भंडारा मार्फत 1 जुलै 2020 रोजी  हरीतक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन करुन अभिवादन केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण,कृषि विज्ञान केंद्र साकोलीचे समन्वयक निलेश वझीरे,कृषि भूषण शेतकरी प्राणहंस मेहर, उद्यान पंडित शेतकरी यादोराव कापगते, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी चंदुलाल राऊत, कृषि भूषण शेतकरी शेषराव निखाडे, देवानंद चौधरी, प्रगतीशील शेतकरी संजय एकापुरे, तानाजी गायधने या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी  तर संचलन पंचायत समिती भंडाराचे कृषि अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले. सन 2019 मध्ये जिल्हयातील पुरस्कार प्राप्त शेतकरी चंदुलाल राऊत, देवानंद चौधरी यांचा विभागामार्फत शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे  आभार कृषि विकास अधिकारी व्ही.जे. पाडवी यांनी मानले.