
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’, ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक…पाकला घरात घुसून ठोकले
नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करताना मंगळवारी रात्री दीड वाजता ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. तीनही सैन्य दलांचे हे एकत्रित ऑपरेशन होते. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य केले होते.
भारताच्या स्ट्र्राईकनंतर पाकिस्तानचे उत्तर
भारताच्या एअरस्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विधान समोर आले आहे. शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की पाकिस्तानच्या जमिनीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले. पंतप्रधान शरीफ म्हणाले, पाकिस्तानला या कृत्याचे शक्तीशाली उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याचे उत्तर दिले जात आहे .
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष लोकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने सिंधु जल संधीला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पाणी भारताने रोखले होते. तसेच अनेक वेळ भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला उत्तर दिले जाईल अशी शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईसाठी लष्कराला फ्री हँड दिला होता.
भारताच्या गुप्तचर विभागाने सर्व टार्गेटची ओळख केली होती. यानंतर संपूर्ण प्लानिंगसह लष्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि आंतरराष्टीय सीमेपासून किती दूर आहेत ही ठिकाणे…
बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी दूर स्थित आहे. येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. हा तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला आहे.
मुरीदके – हे दहशतवादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किमी अंतरावर आहे. येथे लष्कर ए तौयबाचे शिबीर होते. याचा संबंध २६/११ मुंबई हल्ल्याशी होता
गुलपूर – हे दहशतवादी ठिकाण locपासून ३५ किमी अंतरावर आहे.
लष्कर कँप सवाई – हे दहशतवादी ठिकाणी पीओके तंगधार सेक्टरच्या आत ३० किमी आहे.
बिलाल कँप – जैश ए मोहम्मदचे लाँच पॅड. हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमापार पाठवण्यासाठी वापरले जात होते.
कोटली – एलओसीपासून १५ किमी दूर स्थित लष्कराचे हे शिवीर. या ठिकाणी ५० हून अधिक दहशतवाद्यांची क्षमता होती.
लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार काढणार दरमहा ३००० कोटींचे कर्ज!
१.३२ लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव!
मुंबई:-राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या (जीएसडीपी) तीन टक्के कर्ज राज्य सरकारला घेता येते. त्यानुसार कर्ज नेमके कशासाठी पाहिजे, या बाबींची जुळवाजुळव करून राज्य सरकाने कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक कामकाज विभागाकडे (डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल अफेयर्स) प्रस्ताव पाठविला आहे.
त्यात राज्यातील सिंचन योजना, उत्तन ते विरार कोस्टल रोड अशा बाबींचा समावेश आहे. केंद्राकडून मेअखेर त्यास परवानगी मिळेल. त्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून कोणत्या महिन्यात किंवा आठवड्याला सरकार किती कर्ज घेणार, याचे वार्षिक कॅलेंडर निश्चित होईल. त्यानुसार राज्य सरकार कर्ज घेऊन वैयक्तिक योजनांचा खर्च भागविणार असून अन्य रक्कम महत्त्वपूर्ण योजनांसाठी विशेषत: सिंचन योजनांसाठी दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोरोनानंतर राज्य सरकारने चार लाख १३ हजार १५६ कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद सरकारच्या अर्थसंकल्पात आहे. २०१५-१६ ते २०२५-२६ या दहा वर्षांत सरकारच्या डोक्यावर सहा लाख कोटींचे कर्ज वाढले आहे. त्यापोटी सरकारला दरमहा ६१ हजार कोटींपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याचीही नोंद अर्थसंकल्पाच्या पिंक बूकमध्ये आहे.
शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना लाभ वितरीत करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.
एकूण कर्जाची सद्य:स्थिती
⭕⭕वर्ष – एकूण कर्ज
२०२३-२४ – ७,१८,५०७ कोटी
२०२४-२५. – ८,३९,२७५ कोटी
२०२५-२६ – ९,३२,२४२ कोटी
(स्थानिक निवडणुकांमुळे दरमहा मिळणार लाभ)
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सर्वंकष आढावा
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
२७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी, १३ जूनपासून नियमीत वर्गांना सुरुवात
मुंबई, ०६ मे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.
बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
· अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – ८ मे ते २३ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)
· प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – ८ मे ते २३ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)
· ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – ८ मे ते २३ मे, २०२५ (१.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
· पहिली मेरीट लिस्ट – २७ मे, २०२५ (सकाळी ११.०० वाजता)
· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २८ मे ते ३० मे, २०२५ (दुपारी.३.०० वाजेपर्यंत)
· द्वितीय मेरीट लिस्ट – ३१ मे, २०२५ (संध्याकाळी ७.०० वाजता)
· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २ जून ते ४ जून, २०२५ (दुपारी.३.०० वाजे पर्यंत)
· तृतीय मेरीट लिस्ट – ५ जून, २०२५ (सकाळी ११.०० वाजता)
· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –६ जून ते १० जून, २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
· कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- १३ जून २०२५
पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.
आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागांनी सज्ज राहावे- अप्पर जिल्हाधिकारी घुगे
बारावीत पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालय यशाची परंपरा कायम
गोरेगाव,दि.०६ः स्थानिक पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या इ. १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल 95% लागला असून, कला शाखा 90 % तर विज्ञान शाखेचा 100 % आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
यावर्षी विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यामध्ये “विज्ञान शाखेतून अपूर्व मोरेश्वर क्षीरसागर 67.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, रोहिणी यादोरावं पटले 66.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला,आणि उज्वल राधेश्याम कटरे 64.33% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेत अंजली जितेंद्र मोहबे 80.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक, तुलसी राजकुमार रोकडे 77.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि पल्लवी चेतनदास कोहळे 76.00%गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशामागे महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना यश मिळाले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येडे,सचिव एड.टी.बी.कटरे,संचालक यु.टी.बिसेन महाविद्यालयाचे प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालयाने याआधीच्या वर्षी देखील उल्लेखनीय निकाल देत सातत्याने गुणवत्तेचा उच्च स्तर राखला आहे.
अॅड. प्रवीणकुमार श्यामकुवर यांची नोटरीपदी नियुक्ती
गोंदिया ः येथील अॅड. प्रवीणकुमार श्रावण श्यामकुवर यांची भारत सरकारतर्फे नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. श्यामकुवर हे जिल्हा व सत्र न्यायालयात अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
फुंडे सायन्स कॉलेजचे विश्वेष फुंडे अव्वल
गोंदिया,दि.०६ः लावन्या बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित फुंडे सायन्स कॉलेज फुलचुर, गोंदिया 12वी च्या परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजची ग्रामीण भागात असलेली प्रतिष्ठा यावर्षीही कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 188 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थान पटकावले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वेष गजेंद्र फुंडे यांनी प्रथम, मानसी संजीव हत्तीमारे यांनी द्वितीय, तर समीक्षा राजेंद्र चव्हाण आणि पूर्वा राजेंद्र खवासे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 89 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि 55 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक गजेंद्र फुंडे, सौ. मंजुषा फुंडे,नितीन फुंडे, प्राचार्या सौ. शुभांगिनी भंडारकर, प्रा. कंचन शर्मा, प्रा. पूजा तुरकर, प्रा. जयेश कुंभलवार, प्रा. शुभम अवस्थी, प्रा. अश्विन खोब्रागडे, प्रा. प्रकाश पाथोडे, प्रा. रवींद्र मस्करे, प्रा. दुर्गेश बिसेन, प्रा. तेजस भोयर, प्रा. शुभम घोसे आणि विनोद मत्ते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना दिले.
एमआयडीसीतील व्यापार्यांच्या महावितरण मुख्य अभियंता रंगांरीनी एैकल्या समस्या
गोंदिया,दि.०६:येथील एमआयडीसी मुंडीपार येथील राईस मिल व्यापारी वर्गाच्यावतीने आज,महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या सोबत संवाद साधत आपल्या समस्या मुख्य अभियंता पुढे मांडल्या.त्यांत मुंडीपार येथील HT,LT Connection चा व्यापारी वर्गाना होत असलेल्या विजेच्या समस्या मांडल्या व तात्काळ निवारण करण्याची मागणी केली.
शुभलक्ष्मी राइस मिल चे मालक व राइस मिल असोसिएशनचे चे अध्यक्ष, हुकुमचंद अग्रवाल व व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी, यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलताना या वेळी आपल्या विविध समस्या जसे औद्योगिक फिडर वर येणार्या समस्या विस्तार पूर्वक मांडल्या.
त्यानुसार, मुंडीपार येथे फिडर ट्रीप होत असल्यामुळे बर्याच वेळी वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी, त्याचा फटका स्थानीय उद्योग, विशेष करून राईस मिल, व्यापारी यांना होतो.बर्याच वेळी, ट्रीपींगची समस्या होते, व अर्धा तास ते पाउण तास या वेळे दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन, त्याचा फटका, व परीणाम, उद्योजक, व राईस मिल व्यापारी वर्गाला होतो. तसेच लघु व्यापारी वर्गाला सुद्धा याचा फटका होत असतो.
यावर मुख्य अभियंता, श्री. रंगारी यांनी वारनवार ट्रिपिंग च्या समस्येवर तोडगा काहडत, 33 KV फिडर चे लोड कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या एम आय डी सी फिडर चे तान दुसरी कडे वळवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या वेळी, गोंदिया डिविजन चे कार्यकारी अभियंता आनंद जैन व उपकार्यकारी अभियंता,गजानन देव्हारे व एस.के चव्हाण, सहाय्यक अभियंता अन्य अभियंते, व व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.