40.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 15

कु.कृतिका देवानंद खुळसिंगे विद्यालयातून प्रथम, विद्यालयाच्या वतीने सत्कार

0

*येरंडी येथील दहिवले आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश*

*अर्जुनी मोरगाव :*आज दि.५ मे ला जाहीर झालेल्या एच.एस.सी बारावी परीक्षेचा निकालात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील येरंडी/देवलगांव येथील श्रीमती मालीनीताई एस. दहीवले आदिवासी आश्रमशाळेतील कु. कृतिका देवानंद खुळसिंगे या विद्यार्थीनींने प्रतिकुल परीस्थितीवर मात करीत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यार्थीनींने ५३.१७ टक्के गुण घेतले आहे. विद्यालयाचा निकाल ९७.२२ टक्के लागला असुन यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, विद्यालयातील अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा व अतिरीक्त अध्यापन या यशस्वी सेवेच्या कार्याला दिले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था सचिव दलीत मित्र सुखदेवराव दहीवले, अध्यक्ष मालीनीताई दहीवले, उपाध्यक्ष रत्नदिप दहीवले, सहसचिव अनिल दहीवले, प्राचार्य त्रिवेणी रत्नदीप दहीवले, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, संचालक प्रा.नुतन अनिल दहीवले व वर्गशिक्षक चन्द्रवनसी, रहांगडाले, येळे, गजभिये, चवरे सर व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले आणि विशेष म्हणजे शाळेतुन प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. कृतिका देवानंद खुळसिंगे या विद्यार्थीनींला वन्यजीव मार्गदर्शक तथा सामाजिक कार्येकर्ते प्रभाकर दहिकर यांनी त्यांची आर्थिक परीस्थिती लक्षात घेता वेळोवेळी शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करून त्या विद्यार्थीनींला पुढील वाटचालीस प्रेरीत करून शिकण्यास बळ देण्याचं काम करत आले असून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने मदतीचा हात पुढे करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम हे अनेक वर्षांपासून करीत आहेत आणि त्यामुळे या माध्यमातून प्रभाकर दहिकर यांच कौतुक करून सामाजिक कार्येकर्ते म्हणून अनेक कार्यक्रम व इतर ठिकाणी सत्कार, अभिनंदन सुद्धा अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी व परिसरातील नागरीक करीत असतात.

पुराडा आश्रम शाळेतील श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम तालुक्यातून प्रथम

0

देवरी–आज नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी च्या निकालात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथील श्रृती लक्ष्मीशंकर मरकाम हिने देवरी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, श्रृती लक्ष्मीशंकर मरकाम हिने ८३.३३ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला, श्रृती दहावी च्या परीक्षेत सुद्धा देवरी तालुक्यातून प्रथम आलेली होती हे विशेष, श्रृतीने आपल्या यशाचे श्रेय वडील लक्ष्मीशंकर मरकाम सरपंच पुराडा व आई सुनिता मरकाम जिल्हा परिषद शिक्षिका तसेच शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांना दिले असून अथक परिश्रम केल्याने यश नक्कीच मिळते असे सांगितले असून काल झालेल्या निट परीक्षेत (वैद्यकीय प्रवेश चाचणी पुर्व परीक्षा) सुद्धा नक्कीच पास होऊन एमबीबीएस ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल असे सांगितले, एमबीबीएस डॉक्टर बनने हे माझे स्वप्न असल्याचे यावेळी श्रृती ने सांगितले, तिच्या या यशाबद्दल देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद सदस्या सविताताई पुराम,प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायली चिखलीकर, शिरीष सोनेवाने, सुनिल भुसारी,कपील शर्मा,एस के बन्सोड तसेच शासकीय आश्रमशाळा पुराडा येथील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

‘रंग बावरी’ ठरले महावितरणच्या नाट्यस्पर्धेचे ‘सर्वोत्कृष्ट’; ‘सिकॅरिअस’ने पटकावले उपविजेतेपद

0

चंद्रपूरदि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले.

या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले.

नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला.

चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल:

  • सर्वोत्तम नाटक:
    • प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    • द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
  • दिग्दर्शन:
    • प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
  • अभिनय (पुरुष):
    • प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    • द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
  • अभिनय (स्त्री):
    • प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    • द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
  • नेपथ्य:
    • प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
  • प्रकाश योजना:
    • प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
  • पार्श्वसंगीत:
    • प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
  • रंगभूषा-वेशभूषा:
    • प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    • द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
  • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    • सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    • अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    • नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    • संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते जलरथाचे उद्घाटन

0

गोंदिया, दि.5 : शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसार व जनजागृती करण्यासाठी गोंदिया जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जैन संघटन व सहयोगी सुहाना स्पाईसेस यांच्याद्वारे गोंदिया जिल्ह्यामध्ये जनजागृती करणाऱ्या जलरथाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम व निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

       यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सत्यजीत राऊत, सहायक अधीक्षक संजय धार्मिक, सहायक महसूल अधिकारी सर्वश्री पी.झेड.बिसेन, अमोल गजभिये, नोकलाल कटरे, माधुरी मेश्राम, सोनाली भोयर, हरिश्चंद्र पौनीकर (डीपीएम), योगेश वैकुंठी (नरेगा), बिजेएस पदाधिकारी गोरेगाव सौरभ जैन, बिजेएस जिल्हा समन्वयक रोशन गायधने उपस्थित होते.

       जलरथाद्वारे गावा-गावामध्ये जाऊन तलावाचे पुनरुज्जीवन करण्याकरीता माहिती देवून मागणी अर्ज करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे शिवार पोर्टल व बिजेएस ॲपची माहिती देऊन मागणी अर्ज करण्याबाबत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोफत गाळाचे महत्व, तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे फायदे, शेत शिवारामध्ये माती टाकल्याने होणारे फायदे इत्यादी माहिती जलरथाद्वारे पुरविली जाणार आहे.

       तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी महाराष्ट्र राज्यात एकच दर निश्चित करण्यात आलेला आहे. पात्र स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत या कामासाठी अर्ज करुन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पध्दतीनुसार काम करता येईल. तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटूंब शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चित दराने अनुदान दिले जाणार आहे.

भेसळीच्या संशयावरुन ‘टोस्ट’ हमसफर ब्रॉण्डचा साठा जप्त

0

 गोंदिया, दि.5 : अन्न व औषध प्रशासन गोंदिया कार्यालयास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.3 मे 2025 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही.मानवतकर यांनी गोंदिया शहरातील मेसर्स माँ शक्ती एजन्सीज, घमंडी बिअरबार जवळ, भैरव बाबा मंदिर समोर, बावली, गोंदिया या ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन बालाघाट येथून आलेला ‘टोस्ट’ हमसफर ब्रॉण्डचा नमूना घेवून उर्वरित साठा 88 किलो, किंमत 3520 रुपये जप्त केला. सदरचे टोस्ट हे 6 किलोच्या कारटुन बॉक्समध्ये विक्रीस असल्याचे निदर्शनास आले. टोस्ट या अन्नपदार्थाच्या बॉक्सवर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी विक्रेता अशोककुमार रहानदोमल ज्ञानचंदानी यांच्याकडून नमूना घेण्यात आलेला आहे व पुढील कार्यवाही सुरु आहे.

        अन्नपदार्थ खरेदी करतांना त्याच्या वेष्टनावर (बॅग/बॉक्सवर) उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, सदर अन्नपदार्थाचा सर्वोत्तम कालावधी, FSSAI परवाना क्रमांक नमुद असलेले अन्नपदार्थच खरेदी करावेत. अन्नपदार्थ ज्या नावाने खरेदी केले आहे त्याचे खरेदी बील स्वत:कडे ठेवावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी केले आहे.

महावितरण अभियंत्याला मारहाण करणा-याला न्यायालयाचा दंड

0

नागपूर, दि. 5 मे 2025: – महावितरणच्या अभियंत्याला शिवीगाळ करणाऱ्याला तसेच त्याच्या कानशिलात लगावणाऱ्याला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. तालेकर यांनी एकूण साडे दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असुन दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे

शेख छोटेसाहेब शेख नवाब (वय 40), रा. बाबा फरीदनगर, खरबी) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महावितरणचे सहाय्यक अभियंते हरीश मुंगसे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा आरोप आहे. ही घटना 28 एप्रिल 2023 रोजी वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुंगसे हे त्यावेळी खरबी परिसरातील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. आरोपी छोटेसाहेब तेथे आला. त्याला महावितरणकडून वीजेचे मीटर बदलविण्यासाठी फोन आला होता, असे त्याचे म्हणणे होते. यावरून तो कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. मुंगसे त्याला समजावू लागले, यावर छोटेसाहेबने त्यांना शिवीगाळ करीत  मारहाण केली.

याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात सदर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 186, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शेख छोटेसाहेब शेख नवाब याचेवर कलम 353,332 आणि 186 अन्वये दोषी ठरवित कलम 353 अन्वये सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्य बजावताना हल्ला किंवा जबरदस्ती करणे किंवा त्यांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा जबरदस्ती करण्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद याशिवाय कलम 352 अन्वये पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद आणि कलम 186 अंतर्गत पाचशे रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास त्याला एक आठवड्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावित त्याला दिलेला जामीन देखील रद्द केला आहे.

यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के,कोकण विभागाची बाजी

0

जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

:-बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली आहे हे जाहीर करण्यात आले आहे.यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.

नऊ विभागीय मंडळाचा निकाल

पुणे ९१.३२

नागपूर ९०.५२

छत्रपती संभाजीनगर ९२.२४

मुंबई ९२.९३

कोल्हापूर ९३.६४

अमरावती ९१.४३

नाशिक ९१.३१

लातूर ८९.४६

कोकण ९६.७४

कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे.

कोणत्या शाखेची किती टक्केवारी?

विज्ञान- ९७.३५

कला- ८०.५२

वाणिज्य- ९२.६८

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३

आयटीआय- ८२.०३

बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

सेवा सहकारी संस्थांना नफ्यात आणा-संचालक रेखलाल टेंभरे

0

गोरेगाव,दि.०५ः-मांडोदेवी देवस्थान येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या सभेत सेवा सहकारी संस्थाना नफ्यात आण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे तसेच जिल्हा बँकेत संस्थांचे असलेले अधिकार मिळावे अशी भूमिका गोंंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेखलाल टेंंभरे यांनी मांडली.सभेला को-ऑप. बॅंकेचे संचालक रेखलाल टेंभरे,विविध कार्य.सेवा सहकारी संस्था संघटना जिल्हा अध्यक्ष डोमा बोपचे,खरेदी विक्रीचे अध्यक्ष जगदिश येरोलो,केवलभाऊ बघेले,विजय राणे,गोदिया तालुकाअध्यक्ष लखन मेंढे,दुर्गाप्रसाद ठाकरे,तिरोडा अध्यक्ष विलास मेश्राम,हंसराज रहांगडाले,गोरेगाव ता.अध्यक्ष किशोर ठाकरे,ओम पटले,पुनेश बोपचे,वेकंट कटरे,योगराज पारधी,पन्नालाल बोपचे आणि तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थि होते.सभेचे संचालन डॉ योगश हरिनखेडे यांनी केले सभेची प्रस्तावना मोरगाव अर्जनीचे तालुका अध्यक्ष ललीत बाळबुद्धे यांनी केली.सभेचे व्यवस्थापन उपाध्यक्ष शंकर पटले यानी केले.आभार प्यारेलाल गौतम यानी मानले.

जातनिहाय जनगणना, ‘बसप’ विचारधारेचे यश-डॉ.हुलगेश चलवादी

0
काँग्रेस-भाजपच्या बहुजन विरोधी धोरणामुळेच समाज शोषित-पीडित-वंचित


पुणे,दिनांक ५ मे २०२५:-
देशात जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा बहुजन समाज पक्षाच्या विचारधारेचा, मागणीचा आणि लढ्याचा विजय आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.४) व्यक्त केले.काँग्रेस-भाजपच्या बहुजन विरोधी धोरणामुळे हा समाज अजूनही शोषित-पीडित-वंचित असल्याची खंत यनिमित्ताने त्यांनी व्यक्त केली. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ ही घोषणा सर्वप्रथम देणारे पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम जी यांच्या विचारांवर चालणाऱ्या बसपच्या संघर्षामुळेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाहिलांदाच जातनिहाय जनगणना होईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

भाजप-काँग्रेस मध्ये जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरु आहे. मुळात या मागणीचा उगमच ‘बसपा’ आहे. काँग्रेस-भाजप आणि इतर पक्षांची बहुजनांबद्दलचे धोरण पवित्र असते तर,ओबीसी समाज देशाच्या विकासात मोठा भागीदार बनला असता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘आत्मसन्मान आणि स्वाभिमान’चे मिशन त्यामुळे पूर्णत्वास आले असते,अशी भूमिका मा.सुश्री बहन मायावती जी यांची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

महामानव डॉ.बाबासाहेब आणि बसपाच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आज ओबीसी समाज बराच जागरूक झाला आहे.त्यामुळे दलितांप्रमाणे ओबीसींच्या मतांवर डोळा असलेल्या या पक्षांना ते बहुजन हितकारक असल्याचे भासवावे लागतेय. बसपातच दलित, आदिवासी,ओबीसी तसेच सर्व समाजाचे हित समाविष्ट आहे,असे डॉ.चलवादी म्हणाले.

१९३१ आणि स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना घेण्याचा केंद्राच्या निर्णयाचे श्रेय लाटतांना,दलित-ओबीसी समाजातील कोट्यवधी नागरिकांना आरक्षणासह त्यांच्या घटनात्मक हक्कापासून वंचित ठेवण्याचा ‘काळा अध्याय’ नावावर करणाऱ्या आणि त्यामुळेच सत्तेतून बेदखल झालेल्या काँग्रेसला विसर पडला आहे.

परंतु सत्तेपासून दूर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये विशेषतः दलित व ओबीसी समाजाबाबत नव्याने निर्माण झालेलं विश्वासार्ह वाटत नाही. ते फक्त त्यांच्या मतांसाठी केलेलं एक स्वार्थी आणि फसव्या राजकारणाच स्वरूप आहे. आरक्षण निष्क्रिय करून ते अखेरीस संपवण्याचा त्यांचा अशुद्ध हेतू कोण विसरू शकतो? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.

घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्याचा विषय असो वा कलम ३४० अंतर्गत ओबीसींना आरक्षण देण्याचा मुद्दा असो- या सर्व मुद्द्यावर काँग्रेस व भाजपचे वर्तन जातीयवादी आणि द्वेषपूर्ण राहिलं आहे.परंतु, यांची मतांसाठीचे राजकारण मात्र निराळ आहे.त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या राजकारणापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.

अर्थात ‘वोट हमारा राज तुम्हारा-नहीं चलेगा’
या मानवतावादी संघर्षाला योग्य आणि अर्थपूर्ण बनवण्याची व स्वत:च्या पायावर उभ राहण्याची वेळ आली आहे.यात थोडीशीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा घातक ठरू शकतो, आणि भाजप-काँग्रेस यांसारख्या पक्षांवर दलित, ओबीसी व बहुजन समाजाच्या हितां संदर्भात विश्वास ठेवण योग्य नाही, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले

घोगरा- पाटीलटोला ते देव्हाळा खुर्द रस्त्यावर वनविभागाने खोदली नाली रस्ता रहदारीसाठी केला बंद

0

चित्रा कापसे
तिरोडा – तालुक्यातील घोगरा-पाटीलटोला ते देव्हाळा खुर्द(तुमसर) रस्त्यावर वनविभाग तुमसर मोहाडी यांनी आज दिनांक ४/५/२०२५ ला जेसीबी च्या साह्याने रस्त्यावर नाली खोदून रस्ता रहदारीस बंद केला त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत.
एलोरा (देव्हाडा खू.) – पाटील टोला- घोगरा- ते घाटकुरोडा ते चांदोरी बूज – बिरोली- मांडवी – मुंडिपार – बेलाटी बूज ते तहसील कार्यालय तिरोडा हा अंदाजे २०० वर्षा पूर्वी पासून अस्तित्वात असलेला संयुक्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रस्ता ह्या पूर्वी सन २००७ -२००८ या वर्षी प्रधान मंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तुमसर ते तिरोडा मुख्य रस्ता देव्हाडा खू. येथ पर्यंत खडीकरण व डांबरीकरण चे करण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये विजय भाऊ रहांगडाले आमदार तिरोडा यांनी परिसरातील विद्यार्थी , शेतकरी, मजूर व भंडारा, नागपूर जिल्ह्यातील जनतेची सतत ची मागणी व आक्रोश बघता सदर रस्ता मुख्य मंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजुरी प्रदान केली असून सदर रस्ता बांधकाम सुरू आहे व जवळ जवळपास ९० टक्के बांधकाम पूर्णत्वास आले आहे. परंतु देव्हाडा खू येथील ग्राम पंचायत चे पदाधिकारी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करून सदर रस्त्यावर आज JCB च्या साहाय्याने खोदून आडवी नाली तयार आहे व सदर रस्ता रहदारीस बंद करण्यात आला आहे. करीता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सबंधित अधिकाऱ्यांनी तसेच व पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तत्काळ प्रभावाने रस्ता रहदारीस सुरू करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.