34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 8

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक..! जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक

0

अकोला : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आघामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता अकोला जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
ही बैठक गुरुवार,दिनांक 8 मे रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, पश्चिन शहर प्रमुख रमेश गायकवाड, पूर्व शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, गोपाल म्हैसणे, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, तालुकाप्रमुख विजय वानखडे, प्रकाश गीते, अनंत बगाडे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक दांदळे, सचिन गालट, मंगेश म्हैसणे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे, गणेश बोबडे, जिल्हा संघटक बादल सिंग ठाकूर, तालुका संघटक रमेश थुकेकर, शहर संघटक सागर पूर्णेय, राहुल जाधव,महिला समन्वयक स्वानंदीताई पांडे, महिला उपजिल्हाप्रमुख संगीताताई शुक्ला, महिला महानगरप्रमुख निशाताई ग्यारल, महिला शहर प्रमुख प्रीती मोहोळ, जयश्री तोरडमल, प्रतिभा दांगटे, युवा सेना लोकसभा प्रमुख कुणाल पिंजरकर, उपशहर प्रमुख प्रदीप काशीद, राजेश पिंजरकर, राजेश दांडेकर, प्रतीक मानेकर, नितीन बदरखे, भूषण इंदोरिया,स्वप्निल देशमुख, अश्विन लांडगे,दीपक नावकार, शुभम वानखडे, राजेश कलाने, सतीश समुद्रे, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, संजय रोहनकर, मधुकर सोनारगन ,चेतन जैन, समीर शहा, सुभाष भागवत, प्रवीण गावंडे, ऋषिकेश सोनारगन , राहुल सोनारगण, शेख एजाज, सुशांत साठे, योगेश ढोरे, अविनाश मोरे, तुषार इंगळे, प्रकाश परीयाल, आशु काळे, वैभव बोरचाटे, उत्तम डुकरे, विलास मानकर, प्रशांत घाटोळ, सुधाकर गोपकर, अनंत वाकोडे, सचिन शेवलकर, विकास कुरेकर, अक्षय येरमेकर, विशाल धोटे, फिरोज खान, मिलिंद बेंडे, गणेश शेळके, सौरभ शेळके, गोपाल शेळके, सोपान चावरे, तेजस वक्टे , सचिन घावट, सागर आवारे, अतुल अंभोरे, सुरत सिंग राजपूत, राजीव विल्हेकर, प्रवीण घोरमोडे, ज्ञानेश्वर जानोकार, संतोष काटोले, नितीन गंगलवार, नागेश इंगोले, किशोर घाडगे, संदेश काजळकर,भावेश नवले यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनि उपस्थित होते. यावेळी शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल, अकोला तालुकाप्रमुख विजय वानखडे, तालुकाप्रमुख सचिन गालट महिला जिल्हा समन्वयिका स्वानंदीताई पांडे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे यांनी आपले विचार प्रकट केले. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन बांधणी, संघटन रचना, व निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी केले. यावेळी अकोला पश्चिम, अकोला पूर्व व पातुर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांचा मिशन सिंदूर राबवत भारत सरकारने जे सडेतोड उत्तर दिले त्या प्रित्यर्थ पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना मिशन सिंदूर हीच खरी श्रद्धांजली या भावनेने श्रद्धांजली अर्पन आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी मानले.अशी माहिती जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी यांनी दिले.

मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार-उद्योग मंत्री उदय सामंत

0
उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार
-उद्योग मंत्री उदय सामंत
अमरावती, दि. 9 :अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगांना चांगल्या सेवा पुरविण्यात येत आहे. आता याठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये उद्योग यावेत, यासाठी जमिनीचे दर एक वर्षासाठी 600 रूपये ठरविण्यात आला आहे. उद्योगांसाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सामंत यांनी उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सामंत यांनी, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये 5 उद्योजकांनी 1300 कोटी रूपयांचे करार केले. मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण झाली. यावर उपाययोजना म्हणून आता एक वर्षासाठी 600 रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल. त्यासोबतच सामाईक सोयीसुविधांचे दर 67 रूपयांवर आणण्यात आले आहे. यात अधिकच्या दराबाबतही 50 टक्के सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योजकांकडून भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पामधून 10 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योगांशी करार करण्यात आल्यानंतर 68 टक्के उद्योग सुरू करण्यात आले आहे. उद्योगांना सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मात्र उद्योगांसाठी जमिन घेऊन उद्योग सुरू केला नसल्यास जमिनी परत घेतल्या जातील. येत्या काळात अमरावतीमध्ये आयटी पार्क, लघू व मध्यम उद्योजक पार्क यासोबतच आमझरी हे मधाचे गाव म्हणून साकारण्यात येणार आहे. उद्योजकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी शासनाचा पुढाकार राहणार आहे.
गुरूकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे. यात 35 कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा, नास्ता आणि जेवण, तसेच होमस्टेची सुविधा देऊ शकतील. याठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहे. त्यासोबतच येत्या सत्रापासून मराठी भाषा विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत विलीनीकरणाचे संकेत?; मोठा भूकंप होणार

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. “आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय,” या त्यांच्या वक्तव्यानं राजकारणात नवा रंग भरला आहे.

सध्या ठाकरे गट (Thackarey Group) आणि इतर विरोधकांमध्येही एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना, शरद पवारांच्या (Sharad Pawar) या सूचक विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे वाहत असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षात दोन विचारधारा आहेत – एक गट अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाण्याचा विचार करत आहे, तर दुसरा गट भाजपसोबत जाऊ नये असा आग्रह धरत आहे. तसेच इंडिया आघाडीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि विरोधी बाकांवर बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे ठरवतील, असेही सांगितले.

यापूर्वी अनेक आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी मतदारसंघातील प्रश्नांसाठी संपर्क साधल्याचंही समोर आलं होतं. मात्र, माध्यमांसमोर कोणीही उघडपणे भूमिका मांडली नव्हती. आता पक्षप्रमुखांनीच थेट यावर भाष्य केल्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

गेल्या काही महिन्यांत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकदा एकाच कार्यक्रमात दिसून आले. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकीत दोघांची उपस्थिती आणि झालेल्या गुप्त चर्चांमुळे एकत्र येण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली होती. मात्र यावर अधिकृतपणे कुठलाही खुलासा नव्हता.

आता शरद पवारांनी स्वतः या चर्चांना उघडपणे वाचा फोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात हे दोघे पुन्हा एकत्र येतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद

0
– सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई, दि.9: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृह येथे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, यांनी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया, सदस्य डॉ. मनोज पांडा व डॉ. सौम्यकांती घोष यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने आयोगासमोर निवेदन सादर केले. या निवेदनात आयोगाच्या कार्यसूचीनुसार राज्याच्या विविध मागण्या व सूचना मांडण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाने केंद्र व राज्यांमधील विभागणी (Vertical Devolution) ४१ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच अधिभार (cesses) व उपकर (surcharges) हे मुख्य करांमध्ये समाविष्ट करावेत आणि केंद्र सरकारच्या करेतर उत्पन्नाचाही समावेश विभागणीच्या निधीत करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
राज्याने क्षैतिज वाटपासाठी (Horizontal Devolution) नवीन निकष सुचवले आहेत, ज्यामध्ये ‘शाश्वत विकास व हरित ऊर्जा’ आणि भारताच्या ‘जीडीपी’मध्ये राज्यांचा वृद्धीमान योगदान’ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘उत्पन्न अंतर निकष’ (Income Distance Criteria) ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
विशेष अनुदानासाठी १,२८,२३१ कोटींची मागणी
राज्याने विशेष अनुदानांतर्गत मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक मास्टर प्लॅनची अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्प, नवीन उच्च न्यायालय संकुल, कारागृह पायाभूत सुविधा, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वसतीगृहे आणि इको-टूरिझमसाठी एकूण ₹१,२८,२३१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. तसेच राज्यासाठी महसूल तूट अनुदान (Revenue Deficit Grant) सुद्धा शिफारस करण्याची विनंती आयोगाकडे करण्यात आली.
‘एसडीआरएफ’ व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वाढीव निधीची मागणी
राज्याने आपत्ती निवारण निधी (SDRF) अंतर्गत एकूण तरतूद वाढवावी आणि केंद्र-राज्य वाटपाचा हिस्सा ७५:२५ वरून ९०:१० असा करावा, अशी मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनुदान ४.२३ टक्क्यांवरून ५ टक्के विभागणी निधीतून करावे तसेच राज्यातील ग्रामीण व नागरी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या अनुदानाचे वितरण करावे. शहरे व महानगरपालिकांसाठी सार्वजनिक बस वाहतूक व अग्निशमन सेवेसाठीही स्वतंत्र अनुदान द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
या बैठकीदरम्यान आयोगाने व्यापारी व उद्योग प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार– शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक
नवी दिल्ली, 9 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली असून, ती मागणी तात्काळ मान्य करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीदरम्यान हा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. या बैठकीत शैक्षणिक सुधारणांसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या व प्रस्ताव मांडण्यात आले, ज्यांना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शास्त्री भवन येथे श्री. प्रधान यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकत केंद्रीय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंघल, अतिरिक्त सचिव आनंद पाटील, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त संचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक विभाग व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार तसेच अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशव्यापी शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. ही मागणी तात्काळ मान्य करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित सचिवांना केंद्रीय पाठ्यपुस्तक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) पाठ्यपुस्तकांमध्ये याचा समावेश करण्याचे निर्देश दिले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे,” असे श्री. भुसे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांना महाराष्ट्र सदन येथे ही माहिती दिली.
यासोबत, मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेचा राष्ट्रीय शैक्षणिक पातळीवर उचित समावेश होण्याबद्दलची मागणी केली. या मागणीला श्री. प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत महाराष्ट्रात सध्या राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ‘पीएम श्री’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘सीएम श्री’ योजनेअंतर्गत 5,000 शाळांना आदर्श शाळा बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासोबत, 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या वर्गांना आदर्श वर्ग, स्मार्ट क्लासरूम, आनंद गुरुकुल आणि विभागनिहाय विशेष शाळा सुरू करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक सहायता बाबत श्री. भुसे यांनी श्री. प्रधान यांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच, ‘पीएम पोषण’ योजनेअंतर्गत शाळांमधील स्वयंपाकी आणि स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवणे, शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कोट्यात वाढ करणे, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये सरकारी अनुदानित शाळांचा समावेश करणे आणि ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा सुधारणे यासारख्या मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांना धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महिला तलाठी अश्विनी ठोंबरेला ८०० रुपयांची लाच घेणे भोवले

0

सडक अर्जुनी: वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओंकार शेंडे (रा. कोहळीटोला) असे खासगी इसमाचे नाव आहे.नाव असून सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक १७ येथे कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाईदेखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) दुपारी २:३० वाजता दरम्यान सापळा लावला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनी रंगेहात पकडले.

महापालिकांवर ‘बसप’चा निळा झेंडा फडकणार-डॉ.हुलगेश चलवादी

0
‘बॅलेट पेपर’ वर निवडणुका घेण्याची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बसपा ताकदीनीशी लढवणार 


पुणे:-
राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे.उशीरा का होईना,न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकां संदर्भात संविधान अनुरूप निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करीत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.येत्या चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी सज्जा व्हा,असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कॅडरला केले. यासोबतच निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वर घेण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.
सर्वसामान्यांना मतदान आणि नेतृत्व निवडीचे अधिकार बहाल करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेनुसार निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर होणे आवश्यक आहे. बूथ बळकावने, मतपत्रिकांचा गैरवापर करणे असे प्रकार आता तंत्रज्ञानाने सुसज्जीत महाराष्ट्रात होणे शक्य नाही, त्यामुळे मत पत्रिकांवर निवडणूक घ्यावी, या मागणीचा डॉ.चलवादी यांनी पुनरोच्चार केला.
शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांचा विकासासाठी आणि ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या नितीनुसार समाज परिवर्तनासाठी सत्तेच्या चाव्या बसपा कडे असणे आवश्यक आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनावर हत्ती निवडणूक चिन्ह असलेला बसपा चा ‘निळा झेंडा’ फडकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.चलवादी यांनी केले.
‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ ही संकल्पना समोर आणत बहुजनांचे नेतृत्व करणारी बसपा पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. शहर, जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर बसप कॅडर निवडणुकीसाठी सज्ज झाला असून ते उपेक्षितांना ‘शासनकर्ती जमात’ बनवण्यासाठी तन-मन-धन अर्पित करीत प्रयत्नरत आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकार ला बंधनकारक राहणार आहे.विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे तूर्त सुटला आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.या निवडणुकीत मतदार त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवेल आणि बहुजनांच्या हक्काचे विचारपीठ असलेल्या बसपाला पाठबळ देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.
बसपा केंद्र सरकार च्या पाठीशी…
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदुर’ला बसपा चा पूर्ण पाठिंबा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी बसपा उभी राहील, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.दहशतवादाला त्यांच्यात भाषेत उत्तर भारत उत्तर देईल, असे ते म्हणाले.

गावस्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करा – पुलकित सिह

0

जिवती तालुक्यातील विकासकामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडुन पाहणी

जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन, विद्यार्थी,ग्रामस्थांशी संवाद

चंद्रपुर,दि.08- चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे.

          मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व  महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना  मार्गदर्शन केले. उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली.  पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा  आढावा  घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे व तालुका यंत्रणेतील  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लीलाबाई कुर्वे यांचे निधन

0

आमगाव,दि.०८ः तालुक्यातील कट्टीपार येथील रहिवासी व गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची धाकटी बहीण लीलाबाई कुर्वे यांचे कट्टीपार येथील राहते घरी आज ८ मे रोजी साय.4.30 च्या दरम्यान निधन झाले.श्रीमती कुर्वे यांच्यावर उद्या शुक्रवारला ९ मे रोजी 11.00 वाजता कट्टीपार येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार –सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0
· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ
मुंबई, दि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
८ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर व राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक आरोग्य अभियान श्री. रंगा नायक, संचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अबांडेकर, संचालक (शहरी) आरोग्य सेवा डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक श्री. तुळशीदास सोळंके, डॉ. सुनीता गोल्हाईत, डॉ. गोविंद चौधरी, डॉ. सरिता हजारे, सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे (राज्य रक्त कक्ष), तसेच थॅलेसेमिया ग्रुप परभणीचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, थॅलेसेमिया रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याकरिता आणि त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. यामध्ये नियमित रक्त संक्रमण, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासोबतच मोफत आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची उभारणी देखील करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
सकारात्मक परिणाम घडविणारा उपक्रम –सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
शासनाचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, तो समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा एक मोठा पाऊल ठरेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी व्यक्त केला. जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही, हे स्पष्ट करत सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया आजारावरील उपचारपद्धती आता प्रगत झाली असून यांसदर्भात अधिक जनजागृती करण्यात यावी.
या उपक्रमांतर्गत थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचण्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. “थोडीशी काळजी, पुढच्या पिढीचं आयुष्य वाचवू शकते” या घोषवाक्याद्वारे उद्देशून जागरूकतेचा संदेश देण्यात आला. “जीवन सक्षम बनवा, प्रगतीला स्वीकारा” या अभियानाच्या मुख्य सूत्रातुन आरोग्यदृष्टीने सक्षम व थॅलेसेमिया-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधोरेखित करण्यात आला आहे.
यावेळी थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. www.thalesemiyasupport.com या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.मोफत आरोग्य सल्ल्यासाठी १०४ क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.