29.6 C
Gondiā
Monday, May 12, 2025
Home Blog

भाविकांवर काळाचा घाला;मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात;३ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी

0

सातारा:- सातारा जिल्ह्यातील लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. सातारा-लोणंद मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एम एच 04 सीपी 2452) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती.

ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे चा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम एच 42 बीएफ 77 84) हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले .याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते .पुढील तपास सातारा पोलिस सुशील भोसले करीत आहेत.

बाई गंगाबाई ब्लड बँकेत त्वरित ब्लड कंपोनंट युनिट सुरू करा

0

– अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल”

गोंदिया, दिनांक १२–गोंदिया मेडिकल कॉलेजच्या बाई गंगाबाई ब्लड बँकेत अद्याप ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट कार्यान्वित करण्यात आलेली नाही. या महत्त्वाच्या सुविधेच्या अभावामुळे थॅलेसीमिया आणि सिकलसेल अशा गंभीर आजारांनी ग्रस्त निरागस मुलांना वेळेवर प्लाझ्मा, पीआरसी, प्लेटलेट्स अशा आवश्यक रक्तघटकांचा पुरवठा होऊ शकत नाही.

या जनहिताच्या विषयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले रक्तमित्र  विनोद चांदवानी ‘गुड्डू’ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर बाई गंगाबाई ब्लड बँकेत ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू झाले नाही, तर थॅलेसीमिया ग्रस्त बालकांचे पालक आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासह मिळून गोंदिया मेडिकल कॉलेजच्या डीन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

पडोसी भंडारा जिल्ह्यात, जिथे रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे, तिथे ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र गोंदियात, जिथे आरोग्यसेवा आणि रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि मध्यप्रदेश व छत्तीसगड या सीमाभागांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात, अशा ठिकाणी ही युनिट अद्याप सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

मध्यमवर्गीय रुग्णांना ब्लड कंपोनंटची गरज भासल्यास त्यांना खासगी ब्लड बँकांमधून महागात रक्तघटक खरेदी करावे लागतात, त्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझे वाढते आहे.

प्रशासनाकडे जनहितार्थ मागणी करण्यात येते की, बाई गंगाबाई ब्लड बँकेत तातडीने ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू करण्यात यावे, अन्यथा उग्र जनआंदोलन करण्यात येईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.

जेसीआई सीनियर सिटीजन वॉकथान सम्पन्न

0

गोंदिया: जेसीआई एल्युमिनी क्लब द्वारा रविवार को सुभाष गार्डन में आयोजित *वरिष्ठ नागरिक वॉकथॉन* का आयोजन सफलतापूर्वक सम्पन्न हुआ। वॉकथॉन में बड़ी संख्या मे वरिष्ठ नागरिकगण सम्मिलित हुए।

कार्यक्रम के मुख्य अतिथि पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष जेसी पुरुषोत्तम मोदी थे, जिन्होंने उपस्थित प्रतिभागियों का उत्साहवर्धन किया और वॉकथॉन विजेताओं को पुरस्कार वितरित कर सम्मानित किया।

पुरुष वर्ग में दामोदर बडवाईक, पी. डी. पानसे, चंद्रकांत गौतम, किशोर होतचंदानी व महिला वर्ग में श्रीमती कुसुम जायसवाल, श्रीमती साधना अरोड़ा विजयी रहे. सर्वश्री के.डी. अरोड़ा, अक्षय जैन, पदम लनिया, सतीश रायकवार, डॉ. बाबूलाल चौधरी, सतीश रायकवार, पुरुषोत्तम बावनकर, खैमराज गौड़े, पुरुषोत्तम भेलावे, राजेंद्र सातभाई इत्यादि वरिष्ठ नागरिकगण प्रमुखता से वॉकथॉन मे सहभागी हुए.
वरिष्ठ नागरिक  के.डी. अरोड़ा ने अपनी शानदार मिमिक्री से उपस्थितो को खूब हसाया.जेसीआई एल्युमनी क्लब की आँचल उपाध्यक्षा ऐड. कीर्ति आहूजा की प्रमुख उपस्थिति मे सम्पन्न इस
कार्यक्रम का संचालन जेसी वासुदेव रामटेककर नें, प्रस्तावना जेसी भूमी वतवानी व आभार जेसी सारिका ढोमने नें माना.
वॉकथॉन की सफलता हेतु बलवान ग्रुप के प्रशिक्षक श्री योगेश डोडवानी, वरिष्ठ नागरिक  नरेश खेता, मुन्ना उपाध्याय, शंकर सोनी, पंकज शिवनकर, श्रीमती श्रद्धा बोरीकर, शंकर पाठक गार्डन के प्रभारी  महेश कठाने, कर्मचारी  सतीश गौर का विशेष योगदान रहा।

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा अधिवेशन संपन्न

0

20 मे साताराच्या राज्यव्यापी आंदोलनात शामिल होण्याचे आव्हान.
सडक अर्जुनी,    महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) द्वारे जिल्ह्यातील ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सडक अर्जुनी येथे झालेल्या अधिवेशनात यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करुण वेतनश्रेणी, पेन्शन लागू करने, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची व वसुलीची अट रद्द करुण किमान वेतन व भत्त्यावर शंभर टक्के अनुदान राज्य शासनाने देने सह इतर महत्वाच्या मागण्यांना घेवून 20 मे ला ग्रामविकास मंत्री यांचे सातारा स्थित कार्यालयावर बेमुद्दत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना शामिल होण्याचे आव्हान करण्यात आले अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजुर युनियनचे महासचिव कॉ. शिवकुमार गणवीर यांनी केले व कार्यक्रमाची अध्यक्षता चत्रुगन लांजेवार यांनी केली प्रास्ताविक रवींद्र किटे यांनी केले महासंघांचे राज्य कार्याध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस मिलिंद गणवीर यांनी जिल्ह्यातील व राज्यातील होत असलेल्या कार्यक्रमाचा, संघटनेच्या वाटचालीची तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलनाची मांडणी केली या अधिवेशनात आयटकचे जिल्हा ध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद्र पाटील, विवेक काकडे (विद्युत कर्मचारी फेडरेशन) शालूताई कुथे,वर्षा पंचभाई(आशा गटप्रवर्तक), करुणा गणवीर, ललिता राऊत (शापोआ युनियन), पौर्णिमा चुटे (आंगणवाडी कर्म. युनियन) आदी कामगार संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन करत ग्रा. पं. कर्मचाऱ्याबरोबर आपली एकजूट दर्शवली अधिवेशनात मे 5 महिला प्रतिनिधी सह 27 सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची सर्व सम्मतीने निवड करण्यात आली यात चत्रूगण लांजेवार(अध्यक्ष)महेंद्र कटरे (कार्याध्यक्ष), मिलिंद गणवीर (महासचिव), महेंद्र भोयर (कोषाध्यक्ष), आशिष उरकूडे, अशोक परशुरामकर, ईश्वरदास भंडारी, भाऊलाल कटंगकार, (उपाध्यक्ष) रवींद्र किटे(सचिव), विष्णू हत्तीमारे(संघटन सचिव), विनोद शहारे, बुधराम बोपचे(सहसचिव) यांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या अखेर विष्णू हत्तीमारे यांनी आभार मानले.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

भोपाळ, दि. 11 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोपाळ येथे दिली.

सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक आज भोपाळ येथे झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाचा आम्ही पूर्वीच संकल्प केला होता. आज त्यावर दोन्ही राज्यांनी सहमती केली आणि त्यासाठी सामंजस्य करार झाला. यापूर्वी ही बैठक 2000 मध्ये बैठक झाली होती, त्यानंतर 2025 मध्ये ही बैठक झाली. परंतू या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्य परस्परांच्या संपर्कात होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आंतरराज्य जलकरारांना गती देण्यास सांगितले आणि 2016 पासून आम्ही याला गती दिली. तापी मेगा रिचार्ज हे जगातील एक आश्चर्य आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 2,34,706 हेक्टरला सिंचनलाभ होईल, तर मध्यप्रदेशला 1,23,082 हेक्टर सिंचनलाभ मिळेल. महाराष्ट्रात जिथे खारपाणपट्टा आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या समस्या आहेत, तेथे मोठा लाभ या प्रकल्पामुळे होणार आहे. यात जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या पट्ट्यात मोठा दिलासा मिळेल. शेतकर्‍यांच्या जीवनात मोठी क्रांती होईल आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. केंद्रीय योजना म्हणून याचा स्वीकार व्हावा, अशी विनंती आता आम्ही दोन्ही मुख्यमंत्री मिळून केंद्र सरकारकडे पुन्हा करणार आहोत.

या बैठकीत महाराष्ट्राचे मुद्दे सुद्धा आम्ही मांडले. त्यात डांगुर्ली बॅरेज, जामघाट असे महत्त्वाचे मुद्दे होते. या जामघाट प्रकल्पासाठी 28 वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत आलो होतो. पण, आता त्यालाही गती मिळते आहे, याचा आनंद आहे. या जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुढची बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

असा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प

– तापी नदीवर मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण

– एकूण सिंचनाला लाभ : 3,57,788 हेक्टर

– महाराष्ट्राला लाभ : 2,34,706 हेक्टर (जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती) (म्हणजेच सुमारे 5.78 लाख एकर)

– मध्यप्रदेशला लाभ : 1,23,082 हेक्टर (बुर्‍हाणपूर, खंडवा)

– एकूण पाणीवापर : 31.13 टीएमसी

– महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्यप्रदेश : 11.76 टीएमसी

– योजनेची किंमत : 19,244 कोटी (2022-23 ची किंमत)

वाशिम येथे “आपदा मित्र” प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात

0
वाशिम,दि.११ मे – जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढविण्यासाठी “आपदा मित्र” प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि आयटस संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १९ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण महिला व बालविकास भवन येथे घेतले जात आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सामाजिक कार्यकर्ते गजानन मेसरे, आयटस संस्थेचे श्री.फय्याज व अन्य प्रशिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाशिम, रिसोड आणि मालेगाव येथील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षणार्थी ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ म्हणून पुढील काळात कार्य करणार आहेत.आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना अपर जिल्हाधिकारी घुगे म्हणाले, “आपत्ती कधीही, कुठेही येऊ शकते. अशा प्रसंगी आपण सज्ज असलो तर आपत्तीचे संकट संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते.
तहसीलदार पळसकर यांनी “आपत्ती व्यवस्थापन मित्र” संकल्पनेची माहिती देताना सांगितले, “आपण केवळ स्वयंसेवक नसून, समाजाचे खरे रक्षक आहोत. आपत्तीच्या वेळी सजग आणि तत्पर नागरिक म्हणून भूमिका बजावणे हीच खरी सेवा आहे.”
या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक उपचार, अग्निशमन तंत्र, सुरक्षित बचाव उपाय, जलद प्रतिसाद प्रणाली , टीमवर्क व समन्वय अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शाहू भगत यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रशिक्षक अनिकेत जाधव, रुचिका शिर्के, सौरभ कांबळे, यश पवार, वाशिम येथील प्रशिक्षक अनिल वाघ, तसेच नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणात आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले.

खासदार पटेलांनी जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी व समस्या

0

गोंदिया,दि.११ : खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया स्थित निवासस्थानी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत अडीअडचणी व समस्या एैकून घेतल्या.तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन यावर संवाद साधला. कार्यकर्त्यांकडून आलेले निवेदन स्वीकारून त्याच्या अडी – अडचणी व प्रलंबित समस्या जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया व तिरोडा तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून काँग्रेसचे बाजार समितीचे संचालक अरुण नागोजी गजभिये,रुपेश विजयकुमार नशिने,सचिन अवस्थी,सब्बू अग्रवाल,अभय अग्रवाल,प्रकाश जगतराम,रजनीताई कुंभारे सरपंच सीतेपार,दिलदार रंगारी सामाजिक कार्यकर्ते यांचा पक्षात प्रवेश करण्यात आला.गोंदिया तालुका ग्राम बनाथर येथील धनंजय गुप्ता,अशोक बरवे,दिनेश दवणे,हनस बरवे,कुमार बिसेन यांची पक्षात घर वापसी करण्यात आली.

नारीशक्तीच्या नेतृत्वाखाली तिरोड्यात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीचे भव्य आयोजन

0

*तिरोडा*–क्षत्रिय राजपूत महिला मंडळ, तिरोडा यांच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती यावर्षीही पारंपरिक थाटात आणि सामाजिक एकतेच्या भावनेने साजरी करण्यात आली. ९ मे रोजी ठाकूर मोहल्ला, जुनी बस्ती येथे आयोजित या कार्यक्रमात शहरातील राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांच्या संघटित प्रयत्नांमुळे हा सोहळा एक आदर्श सामाजिक उपक्रम ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात एक भव्य शोभायात्रा काढून झाली. महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या झांक्या, बँड-बाजे, डीजे आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे वातावरण उत्सवमय झाले. देशभक्तीपर गाण्यांवर युवक-युवतींनी नृत्य करत सहभाग घेतला. संपूर्ण तिरोडा शहर देशभक्तीच्या रंगात न्हाल्यासारखे भासले.या कार्यक्रमाचे संपूर्ण नेतृत्व क्षत्रिय राजपूत महिला मंडळाने केले. त्यांच्या संघटन क्षमतेमुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून एक अनुकरणीय उपक्रम साकारला गेला. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक ऐक्याला बळकटी मिळाली आणि परंपरांचे महत्त्व अधोरेखित झाले.कार्यक्रमात उपस्थित श्री. उदय कुमार जी प्रमर, विजयसिंह बैस, नर्सिंग गहेरवार, अजयसिंह गौर (माजी नगराध्यक्ष), आणि इतरांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी युवकांना त्यांच्या आदर्शांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात महिलांनी व लहानग्यांनी पारंपरिक नृत्य, गीत व लघुनाटिका सादर केल्या. यामध्ये राजपूत संस्कृतीचा अभिमान व्यक्त झाला. नंतर आयोजित सामूहिक स्वरुचि भोजनात समाजबांधवांनी आनंदाने सहभाग घेतला. भोजन व्यवस्थापनाची जबाबदारी महिलांनी कौशल्याने पार पाडली.
महाराणा प्रताप यांचे जीवन हे राष्ट्रभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे केवळ परंपरेचा सन्मान नाही, तर त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करण्याची संधी आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या भव्य आयोजनामुळे तिरोडा येथील क्षत्रिय समाजात नवचैतन्य निर्माण झाले. नारीशक्तीच्या नेतृत्वात पार पडलेला हा सोहळा सामाजिक एकता, परंपरेची जपणूक आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठरला. राजपूत महिला मंडळाच्या परिश्रमांनी हे आयोजन तिरोडाच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणारे पर्व ठरले.कार्यक्रमाचे संचालन श्री. रितेश गहेरवार यांनी प्रभावीपणे केले, तर सायली राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचे त्यांनी विशेषतः अभिनंदन केले.

समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याशी भेट

0

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा
—————–
चित्रा कापसे/तिरोडा —नागपूर-गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवे प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि अन्यायकारक भूमिगत प्रक्रिया याविरोधात आवाज उठवण्यासाठी समृद्धी एक्सप्रेसवे शेतकरी संघर्ष समिती, तिरोडा यांचे शिष्टमंडळ आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री आणि नागपूरचे लोकसभा खासदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळात डॉ. दिनदयाल पटले, सतीश पटले आणि संदीप अनकर यांचा समावेश होता. त्यांनी गडकरी साहेबांना एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये कमी प्रमाणात जमीन अधिग्रहण मोबदला ,वैयक्तिक नोटीसा न देणे, बेकायदेशीर चावडी नोटीसा, पांदन रस्त्यांची व पाण्याच्या प्रवाहाची व्यवस्था न करणे, पुनर्वसनाची प्रलंबित प्रक्रीया यांचा समावेश होता.

गडकरी साहेबांनी निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्यात येईल, आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

चंद्रपूरात वैनगंगा नदीत ३ भावी डॉक्टर बुडाले;मित्रांसोबत सुट्टी घालवणे पडले महागात;शोध सुरू

0

चंद्रपूर;-चंद्रपूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी आलेले एमबीबीएसचे तीन विद्यार्थी पाण्यात बुडाले आहेत.यात गोपाळ गणेश साखरे(रा.चिखली,जि.बुलढाणा),पार्थ बाळासाहेब जाधव(शिर्डी,जि.अहिल्यानगर) व स्वप्नील उध्दवसिंग शिरे(जि.छत्रपतीसंंभाजीनगर)यांचा समावेश आहे. या घटनेबद्दल कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. हे विद्यार्थी गडचिरोली येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते. पोहण्यासाठी आलेल्या या तिघांवर काळाने घाला घातला असल्याचे बोल उमटत आहेत.

मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गडचिरोली येथील ८ एमबीबीएसचे विद्यार्थी गेले होते,त्यापैकी ३ विद्यार्थीना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचलेले असून पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध हा घेतला जातोय. आज शनिवारची सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी आले होते.

मात्र, यादरम्यान तिघेजण पाण्यात अचानक बुडाले. दरम्यान पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र, तिघेजण बुडाले. अनेक प्रयत्न करूनही तिघेही शोधकार्यदरम्यान सापडले नाही. शेवटी रात्र झाल्याने ही शोधमोहिम प्रशासनाकडून थांबवण्यात आली.आज परत शोधमोहिम ही सुरू केली गेली आहे. या घटनेने तिघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.