34 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 10

महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले 

0

बोधगया येथे सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात राजकुमार बडोले यांचा सहभाग

गोंदिया,दि.०८- महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे आणि बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी घेऊन बोधगया येथे आंदोलन अत्यंत शांततामय वातावरणात सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार व राजकुमार बडोले फाउंडेशन चे मार्गदर्शक राजकुमार बडोले यांनी ऐतिहासिक धम्मयात्रा — “धम्मचर्या” — दीक्षाभूमी (नागपूर) ते महाबोधी महाविहार, बुद्धगया (बिहार) दरम्यान सुरू केली होती. या यात्रेमुळे नवयुवकांमध्ये बौद्ध विचारधारा अधिक दृढ होईल आणि जागृती निर्माण होणार आहे.

बोधगया मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मीयांचे ते श्रद्धास्थान आहे. परंतु 1949 साली लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यामुळे या मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांसोबत इतर धर्मीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला. याला विरोध म्हणून बौद्ध भिक्षूंनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शांततामय आंदोलन बोधगया येथे सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था बोधगया येथे जाऊन आंदोलनात सहभागी झाला होता.

सरकारसोबत चर्चा करणार : राजकुमार बडोले यांचे आश्वासन

सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या विषयावर राज्यसरकारचे लक्ष्य वेधणार असल्याचे यावेळी राजकुमार बडोले यांनी सांगितले. तसेच विविध मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन १९४९ मधे लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यात सुधारणा करण्यासाठी विनंती देखील राजकुमार बडोले करणार आहे.

 

देवरी, चिचगड होणार प्रकाशमान, 132 केव्ही उपकेंद्रासाठी आ. फुके यांचा पुढाकार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

गोंदिय- जिल्ह्यातील देवरी येथे प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी देवरी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे देवरी आणि चिचगड भागातील वीज समस्या लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या देवरी व चिचगड भागात कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पंपवरही याचा मोठा परिणाम होतो. शेतीला आवश्यक असलेल्या सिंचनाच्या वेळा चुकत असून घरगुती व औद्योगिक वीजपुरवठ्यातही व्यत्यय येतो.

या विषयावर आमदार डॉ. परिणय फुके यांनी अनेक वेळा संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून, नागरिकांच्या सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली. देवरी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विशेषतः देवरी व चीचगडमध्ये उपकेंद्र उभारल्यास वीज दाबाचा प्रश्न कायमचा सुटेल, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेत ऊर्जाविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देवरी व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी आणि इतर वीज गरजांसाठी स्थिर आणि पुरेसा पुरवठा होणार आहे.

आमदार डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देवरी व चिचगड वीजप्रश्न मार्गी लागत असून, हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास संपूर्ण परिसर सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस उपक्रमाचा यशस्वी टप्पा पूर्ण

0
विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा
१५० दिवसांचा आगामी कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.७ : प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले आहे आगामी १५० दिवसांच्या कार्य कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, राज्यस्तरांवरील सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा व अधिका-यांचा गुणगौरव बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य सचिव राजेश कुमार यासह मंत्रीमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,शंभर दिवसांचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा होता. लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटी) या तीन आधारांवर प्रशासनात पुढे जाणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत 10 प्रमुख मुद्यांवर सादरीकरण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने काम करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील 12 हजार 500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे.याच उपक्रमांत राज्याच्या 48 विभागांनी एक स्पर्धात्मक सादरीकरण सादर केले. प्रत्येक विभागाने स्वतः प्रश्नपत्रिका तयार केली व स्वतःच उत्तरंही दिली. 100 दिवसांमध्ये काय साध्य करणार हे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दाखवून दिली.प्रशासनात संरचनात्मक सुधारणा करणे ही काळाची गरजे आहे.नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर सुधारणा राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दि.६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ हा पुढील 150 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. व शासकीय सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये विविध उपक्रम राबविल्यास ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा तयार करणे सुलभ होईल. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मध्ये 16 शासकीय विभागांचे एकत्रीकरण करून संबधित विभागांचे सचिव संबधित (उदा. कृषी,आरोग्य) यामध्ये अल्प व दीर्घ कालावधीत उद्दीष्ट आणि त्याची पूर्तता विभागातील आव्हाने,बलस्थाने यावरती काम केले जावे.व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी हे आहे 16 क्षेत्रासाठी आहे यामध्ये
कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, भूमी, पाणी, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, कल्याण, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान, मानव संसाधन या विभागांचा समावेश आहे.२०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यात हे व्हिजन तयार करावे. १५० दिवसाच्या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणामध्ये Ease of Living मध्ये कार्यालयीन सेवा अधिक सुलभ करणे, Ease of Doing Busines प्रत्येक व्यावसायिक सेवा अधिक सुलभ करणे, G2G – Ease of Working राज्याअंतर्गत आणि केंद्रांच्या विविध विभागांशी समन्वय साधणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
*शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करावे* – *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आणि प्रशासन हे रथाची दोन चाक आहेत दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.नागरिकांना मंत्रालयात यावे लागू न देता स्थानिक पातळीवरच आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, ही शासनाची भूमिका आहे,जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. या उद्दिष्टेपूर्तीमध्ये अनेक विभागीय धोरणे, लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या विभागाच्या कार्याचा गौरव करण्यात आला असू प्रेरणादायक कार्य आहे.”मी देखील मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम राबविले गेले, शासनावर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले आहे त्यामुळे लोकांच्या या शासनाकडून अधिक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि शासनाने अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्यकरणे गरजेचे आहे असे सांगून शंभर दिवसांचा आराखडा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 150 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
शंभर दिवसात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या विभाग आणि अधिका-यांचा गौरव
यावेळी राज्यातील सर्व विभागांचा शंभर दिवसांच्या कामांचा आढावा तसेच या कामाचा उत्कृष्ट रित्या पाठपुरावा करून सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रथम क्रमांक विजेते अधिकारी यांनी त्यांनी केलेल्या कामांचे सादरीकरण केले.
सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग म्हणून महिला व बाल विकास विभागाचे मंत्री अदिती तटकरे,सचिव अनुप कुमार यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर,कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,ग्रामविकास विभाग मंत्री जयकुमार गोरे,प्रधान सचिव एकनाथ डवले,परिवहन व बंदरे विभाग मंत्री नितेश राणे,अपर मुख्य सचिव बंदरे विभाग संजय सेठी यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रोहन घुगे, नागपूर विनायक महामुनी, नाशिक आशिमा मित्तल, पुणे गजानन पाटील, वाशिम वैभव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर – विनय गौडा जी. सी., कोल्हापूर अमोल येडगे, जळगाव आयुष प्रसाद, अकोला – अजित कुंभार, नांदेड राहुल कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक पालघर – बाळासाहेब पाटील, गडचिरोली -निलोत्पल, नागपूर (ग्रामीण) – हर्ष पोतदार, जळगाव – महेश्वर रेड्डी, सोलापूर (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर मनीषा आव्हाळे, पिंपरी-चिंचवड शेखर सिंह, पनवेल मंगेश चितळे,तिसरा क्रमांक विभागून नवी मुंबई आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त मीरा भाईंदर मधुकर पाण्डेय, ठाणे आशुतोष डुंबरे, मुंबई रेल्वे डॉ. रवींद्र शिसवे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उपमहानिरीक्षक म्हणून परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, कोकण संजय दराडे, नांदेड शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त कोकण डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिक डॉ. प्रवीण गेडाम, नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम आयुक्त, संचालक म्हणून संचालक, तंत्र शिक्षण विनोद मोहितकर, आयुक्त, जमाबंदी डॉ. सुभाष दिवसे,आयुक्त, आदिवासी विकास श्रीमती लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान निलेश सागर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण राजीव निवतकर यांचा सत्कार करण्यात आला.
*शंभर दिवसाच्या कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभागामध्ये*
अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग दिपक कपूर,अपर मुख्य सचिव खनिकर्म विभाग व गृह विभाग इक्बालसिंह चहल,अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे,अपर मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, बंदरे विभाग संजय सेठी,प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग एकनाथ डवले,अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग वेणुगोपाल रेड्डी,प्रधान सचिव, कामगार विभाग आय.ए. कुंदन,प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग श्रीमती अंशु सिन्हा,सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग एन. रामास्वामी, सचिव, रोजगार हमी योजना विभाग गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
*९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये*
९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग श्रीमती आभा शुक्ला,अपर मुख्य सचिव, महसूल विभाग राजेश कुमार मीना,अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग संजय सेठी,अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग श्रीमती सोनिया सेठी,प्रधान सचिव, शालेय शिक्षण श्री. रणजित सिंह देओल,सचिव, उद्योग विभाग डॉ. पी. अनबलगन सचिव, अन्न, औषध प्रशासन विभाग धीरज कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
*सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार*
सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयीन कामकाजासाठी दिला जाणा-या सेवाकर्मी पुरस्कार प्रथम तीन क्रमांकाचे पुरस्कार वितरण पार पडले. यामध्ये ज्या विभागाच्या मंजूर पदसंख्या १० हजार पेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये मनिषा पाटणकर-म्हैसकर अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनिषा वर्मा अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,श्रीमती शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त (राज्यकर) विभाग यांचा सत्कार करण्यात आला. मंजूर पदसंख्या ३००० ते १०००० पद असलेले विभाग डॉ. रिचा बागला प्रधान सचिव, वित्त विभाग (लेखा व कोषागारे),श्रीमती विनीता वैद सिंगल प्रधान सचिव,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव, गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क)मंजूर पदसंख्या ३००० पेक्षा कमी असलेल्या विभागाचे असीमकुमार गुप्ता ,अपर मुख्य सचिव, नगरविकास विभाग (नवि-१),श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, राजगोपाल देवरा ,अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचा सत्कार करण्यात आला.
*****

महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

0

नवी दिल्ली 7 : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने सुवर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

दुसरीकडे, नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसी, बिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली.

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार

0

गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.7 : युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान केल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने तेथील लॉइड स्टील कंपनी व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कर्टीन विद्यापीठासोबत केलेल्या करारामुळे विद्यापीठामधील शिक्षणाचा दर्जा उंचावून आगामी काळात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक समृद्ध जिल्हा म्हणून उदयास येईल व जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच  पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात राजभवन, मुंबई येथे सांमजस्य करार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली तसेच इतर नक्षल प्रभावित भागातील नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आला. त्याच्या फलस्वरूप गडचिरोली येथे विकासाची पहाट होत आहे असे सांगून कोणताही विकास सर्वसमावेशक असल्याशिवाय अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी यापुढे देखील कठोर पावले उचलतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वी आपण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह गडचिरोलीचा दौरा केला होता असे सांगून गोंडवाना विद्यापीठाने स्थानिक गरज विचारात घेऊन अभ्यासक्रम आखावे तसेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील हे पाहावे असे राज्यपालांनी सांगितले.

गडचिरोली येथे विपुल खनिज संपदा असून तेथे उत्तम प्रतीचे लोहखनिज आहे.  त्याठिकाणी आज धातू व खनिजाच्या शोधन व विनियोगासाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे असे सांगून कर्टीन विद्यापीठाशी सहकार्यामुळे खनिज क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाने लॉईड्स स्टील व एनर्जीच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

गडचिरोली देशातील ‘स्टील हब’ होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खनिज व धातू क्षेत्रातील उद्योग स्थापन झाल्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली जिल्हा देशातील स्टील निर्मितीचे मोठे केंद्र होईल व जिल्ह्याचे मागासलेपण इतिहासजमा होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.  खनिज व धातुशास्त्र या विषयांकरिता जगात दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य करार केल्यामुळे आजचा दिवस गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार करण्याची एकाच आठवड्यात ही दुसरी वेळ आहे असे सांगून मुंबईत झालेल्या ‘वेव्ह्ज’ शिखर परिषदेच्या वेळी पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठासोबत नवी मुंबई येथे कॅम्पस  स्थापन करण्याबाबत करार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली येथील विद्यापीठाचा लॉइड्स स्टील तसेच कर्टीन विद्यापीठासोबत तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्याबाबत करार झाल्यामुळे राज्यातील उद्योगाला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाची कवाडे उघडली असून देशाबाहेरील विद्यापीठांना राज्यात कॅम्पस स्थापित करण्याचे दृष्टीने नवी मुंबई येथे ‘एज्युसीटी’ निर्माण करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  जगातील १२ नामवंत विद्यापीठांनी आपापले कॅम्पस एज्युसीटी नवी मुंबई ठिकाणी उघडण्यास मान्यता दिली असून यॉर्क, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व इलिनॉईस विद्यापीठांनी अगोदरच तेथे कॅम्पस सुरु केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी मुंबई एज्युसीटी येथे सर्व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस  स्थापन झाल्यावर त्याठिकाणी ८०,००० ते एक लाख विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेता येईल असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

लॉइड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचे कौतुक करून त्यांनी धैर्य दाखविल्यामुळे गडचिरोली येथे एकात्मिक स्टील उद्योग सुरु करणे शक्य झाले असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

स्थापनेपासून अवघ्या १२ – १३ वर्षात गोंडवाना विद्यापीठाने चांगली प्रगती केली असे सांगून विद्यापीठाने तंत्रज्ञान संस्था सुरु केल्यामुळे  तसेच कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य केल्यामुळे संस्थेतून देशात खनिज उद्योग तसेच धातुशास्त्र या विषयातील उत्तम तज्ज्ञ तयार होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, लॉईड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांचेमध्ये करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये उभयपक्षी पदवी (ट्विनिंग डिग्री) प्रदान करण्याबाबत करार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार डॉ.परिणय फुके, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी,  तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

पिछड़े वर्ग के पर अन्याय, कांग्रेस ने किया आंदोलन

0

गोंदिया. महाराष्ट्र की महायुति सरकार ने एससी, एसटी के विकास के लिए आई निधि को अन्यत्र आवंटित कर दिया है. इस प्रकार महाराष्ट्र सरकार द्वारा इस पिछड़े वर्ग के साथ अन्याय किया जा रहा है. इसका विरोध करने के लिए गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से 7 मई को डा. बाबासाहब आंबेडकर चौक में डा. बाबासाहब की प्रतिमा पर माल्यार्पण कर आंदोलन किया गया. इस दौरान उपविभागीय अधिकारी के माध्यम से राज्यपाल को ज्ञापन भेजा गया.
ज्ञापन में बताया गया है कि महाराष्ट्र राज्य में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के बच्चों को शैक्षणिक छात्रवृत्ति नहीं मिली है. इसके अलावा, रमाई घरकुल योजना के तहत घरों के निर्माण के लिए कोई निधि प्राप्त नहीं हुई. अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लाभार्थियों को व्यक्तिगत लाभ योजनाएं नहीं मिलीं. महात्मा फुले पिछड़ा वर्ग महामंडल, अन्नाभाऊ साठे विकास महामंडल, एनटी, वीजेएनटी, ओबीसी को निधि की कमी से लाभ नहीं मिला. सरकार ने सबरी घरकुल योजना जैसी विभिन्न योजनाओं के लिए निधि उपलब्ध नहीं कराया है. लेकिन अब सिर्फ सामाजिक न्याय विभाग के पास 410 करोड़ 30 लाख रु. व आदिवासी विभाग के पास 335 करोड़ 60 लाख रु. इतना निधि उपलब्ध होने के बावजूद उसे अन्यत्र आवंटित कर महायुति सरकार ने इन दोनों विभागों से जुड़े समाज के शैक्षणिक, आर्थिक और सामाजिक विकास को रोकने की साजिश रची है. उक्त सरकार ने अनुसूचित जातियों व जनजातियों के साथ-साथ एनटी, वीजेएनटी व ओबीसी विरोधी है यह स्पष्ट किया. सरकार विभिन्न मुद्दों पर भी विफल रही है, जैसे किसानों को धान का बोनस नहीं, बिजली नहीं, बेमौसम बारिश से प्रभावित लोगों को मुआवजा नहीं, रोजगारों को रोजगार नहीं, बेघर लोगों को आवास नहीं तथा रोजगार गारंटी योजना के तहत काम नहीं. आंदोलन में सांसद प्रशांत पडोले, जिला कांग्रेस अध्यक्ष दिलीप बंसोड, सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,राधेलाल पटले, शहर अध्यक्ष एड. योगेश अग्रवाल,राजकुमार पटले,डेमेंद्र रहांगडाले,संदिप भाटिया,राजकुमार पुराम,गौरव बिसने, रोशन बडोले, प्रवीण चव्हाण, मंथन नंदेश्वर, मनिष चव्हाण, कैलाश कुसराम, अनिल मेश्राम सहित अन्य कार्यकर्ता उपस्थित थे.

इंदोरा खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

0

तिरोडा- तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील रहिवासी भैय्यालाल पारधी यांच्या गायीवर हल्ला करून जागीच ठार केले. त्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यावर शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आज 7 मे रोजी दुपारी 12.30 वा. वाढोणा शेतात वाघाने गाईला गाईला ओढत झाडी झुडपात नेले व शिकार केली. शेतकऱ्याचे उदारनिर्वाह दुध संकलन करून करीत असल्यामुळे शेतकऱ्याची दुबती गाय वाघाने शिकार केल्याने. शेतकऱ्यावर फार मोठी संकट ओढवीले आहे. शासनाने त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या

0

गोंदिया—बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी लागला. यात अनुउत्तीर्ण झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांने स्वत:च्या जन्मदिनीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.७) दुपारी २ वाजता आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली.
क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा शिवणकर हा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. यात क्रिष्णा शिवणकर हा अनुत्तीर्ण झाला. आपले सर्व मित्र उत्तीर्ण झाले मीच अनुउत्तीर्ण झालो यातून त्याला नैराश्य आले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो थोडा नाराज असल्याचे बाेलल्या जाते. क्रिष्णाने बुधवारी घरी कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

जन्मदिनीच आवळला गळफास
क्रिणा शिवणकर या विद्यार्थ्याचा बुधवारी (दि.७) जन्मदिवस होता. क्रिष्णाचा जन्मदिवस असल्याने त्याचे कुटुंबीय सुध्दा आनंदात होते. तो बारावीत अनुत्तीर्ण झाला याची कुठलीही नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो असे प्रोत्साहान त्याच्या आई-वडीलांनी क्रिष्णाला दिले. मात्र क्रिष्णाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने घरी कुणीही नसताना जन्मदिन गळफास घेवून आत्महत्या केली.

आई-वडील चालवितात छोटेस हाॅटेल

क्रिष्णाचे वडील धर्मराज शिवणकर यांची आमगाव येथे छोटेसे हॉटेल आहे. ते चहा व नाश्ता तयार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावायचे. यात क्रिष्णा आणि त्याची आई सुध्दा धर्मराज यांना मदत करायचे. सुटीच्या दिवसात क्रिष्णा सुध्दा वडीलांना मदत करायचा. मात्र क्रिष्णाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा धक्का बसला.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण, ‘या’ भागात आणीबाणीची घोषणा!

0

भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांना अखेर आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. यातूनच स्पष्ट दिसून येते आहे की, पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचंड हादरून गेलाय.

जम्मू-कश्मीरच्या (Pahalgam Terrorist Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे. भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी ‘भारत हल्ला करणार नाही, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत’ अशी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री मरियम नवाझ (Maryam Nawaz) यांनी आता प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे.

या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये तात्काळ बंद करण्यात आली आहेत. स्थानिक विमानतळांवरील उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनाने संपूर्ण प्रांतात हाय अलर्ट जाहीर केला आहे. इतकंच नव्हे तर सर्व रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या असून, त्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने पाकिस्तानमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबावर हल्ला 

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केवळ सामान्य दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले नाहीत तर मसूद अझहर (Masood Azhar) याच्या कुटुंबावर थेट कारवाई करत मोठा खात्मा केला आहे. या कारवाईत अझहरचा भाऊ रौफ असगर (Rauf Asghar) गंभीर जखमी झाला असून त्याचा मुलगा हुजैफा आणि पत्नी ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातील एकूण 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रौफ असगर भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.

या कारवाईनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ‘आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत’ या प्रकारच्या वल्गनांचा फोलपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. भारताच्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानने गुडघेच टेकले आहेत, मरियम नवाझ यांची राजकीय आणि प्रशासकीय अडचणही वाढली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी– पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि.7: मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईचा निधी अद्याप मिळाला नाही, त्यांना हा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. संबंधित विमा कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करु नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
सन 2023-24 व 2024-25 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही, या अनुषंगाने आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार राहूल पाटील हे दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. कुलकर्णी, आयसीआयसीआय लोंम्बार्ड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
सन 2023-24 व 2024-25 या वर्षातील प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीचा निधी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्री यांनी या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. आज सदर विषयाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पिकविमा पोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांना तात्काळ मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करु नये. संबधित विमा कंपनी व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी पिकविम्याचा निधी शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करावा. याबाबत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये.
यावेळी आमदार श्री. विटेकर, श्री. गुट्टे, श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना नसैगिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानपोटी पिकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली.
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी 2023-24 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 24,651 शेतकऱ्यांना रु. 37.73 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 24,587 शेतकऱ्यांना रु. 37.65 कोटी निधी वाटप करण्यात आला.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 हवामानातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 6,73,000 शेतकऱ्यांसाठी रु. 299.23 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 6,70,217 शेतकऱ्यांना रु. 298.75 कोटी निधी वाटप करण्यात आला. तर 2,783 शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 50,270 शेतकऱ्यांना रु. 104.77 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 50,247 शेतकऱ्यांना रु. 104.73 कोटी निधी वाटप करण्यात आला. तर 23 शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 काढणी पश्चात अंतर्गत 9,317 शेतकऱ्यांसाठी रु. 24.18 कोटी निधी मंजूर असून शासनस्तरावरुन हा निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
*-*-*-*-*