
गोंदिया,दि.०९ ) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. तीन रुग्णांचा कोरोनाच्या बाधेमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ७६ कोरोना बाधित रुग्णांनी उपचारातून कोरोनावर मात केली तर आज ११६ नवे रुग्ण आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे ८२ वर्षीय रुग्ण राहणार रामनगर, ६० वर्षीय रुग्ण राहणार कन्हारटोली गोंदिया यांना अस्थम्याचा त्रास होता यांचा मृत्य घरी झाला, ६८ वर्षीय रुग्ण राहणार सडक/अर्जुनी यांना खाजगी रुग्णालयातून शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे संदर्भीत करण्यात आले होते व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून १८३५ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून ८७९ नमुने असे एकूण २७१४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
आज जे ११६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ६० रुग्ण आज आढळले आहे. यामध्ये अदासी-१, सिव्हील लाईन-१०, चंद्रशेखर वार्ड-२, दवनीवाडा-१, एकोडी-१, फुलचूर-८, गणेशनगर-२, गोविंदपूर-२, गोंदिया-२, गुदमा-१, गौतमनगर-४, हरिकाशीनगर-१, हिवरा-१, कारंजा-१, कुडवा-१, कन्हारटोली-१, कृष्णपुरा वार्ड-१, मरारटोली-३, मामा चौक-१, मोहाडी-१, न्यू लक्ष्मीनगर-१, रामनगर-४, रापेवाडा-२, श्रीनगर-१, शास्त्रीवार्ड-२, सेलटॅक्स कॉलनी-१, बसंतनगर-१, यादव चौक-३ रुग्ण. गोंदिया येथे काल आढळलेला एक रुग्ण हा स्वागत लॉन येथील नसून तो त्या परिसरात राहणारा आहे.
तिरोडा तालुक्यातील गराडा-२, बेलाटी/खुर्द-३, तिरोडा-१, करटी-१, कोडेलोहारा-१, शास्त्रीवार्ड-१, विहिरगाव-१, पारसनगरी-१, अवंती चौक-२, धादरी-१, शहिद मिश्रा वार्ड-१, सर्रा-५, सतोना-१ रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील मोहगाव/सोनी-३, हिरडामाली-२, कुऱ्हाडी-१, चिचगावटोला-९, गोरेगाव-२ रुग्ण. आमगाव तालुक्यातील देवरी रोड-१, तुकडोजी चौक-१, कुंभारटोली-३, रिसामा-१ रुग्ण. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-१, धनसुवा-१ रुग्ण. देवरी तालुक्यातील घोनाडी-४, देवकी-१ रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील मुंडीपार-२, सडक/अर्जुनी-१ व बुध्दनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१४६६, तिरोडा तालुका-३८९, गोरेगाव तालुका-१०१, आमगाव तालुका-२००, सालेकसा तालुका-८०, देवरी तालुका-११५, सडक/अर्जुनी तालुका-८९, अर्जुनी/मोरगाव तालुका-१२२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-४५ रुग्ण आहे. असे एकूण २६०७ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यातील ७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-५२, तिरोडा तालुका-५, आमगाव तालुका-१७, सडक/अर्जुनी-१ व सालेकसा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत १३७५ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७१४, तिरोडा तालुका-२८९, गोरेगाव तालुका-३७, आमगाव तालुका-९०, सालेकसा तालुका-४२, देवरी तालुका-४८, सडक/अर्जुनी तालुका-६६, अर्जुनी/मोरगाव तालुका-८२ आणि इतर -७ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता ११९४ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-७३१, तिरोडा तालुका-९३, गोरेगाव तालुका-६३, आमगाव तालुका-१०६, सालेकसा तालुका-३७, देवरी तालुका-६८, सडक/अर्जुनी तालुका-२१, अर्जुनी/मोरगाव तालुका-४० आणि इतर-३५ असे एकूण ११९४ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी ११७८ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व १६ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ४०७ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-३७०, तिरोडा तालुका-१०, गोरेगाव तालुका-००, आमगाव तालुका-८, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१० व इतर ०० असे एकूण ४०७ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्हयात आतापर्यंत ३८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-२०, तिरोडा तालुका-७, गोरेगाव तालुका-१, आमगांव तालुका-४, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-२ व इतर ठिकाणच्या तीन रुग्णाचा समावेश आहे.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २०३८९ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १७५०९ नमुने निगेटिव्ह आले. तर १८३५ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ३१३ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ७३२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १४ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४९० व्यक्ती अशा एकूण ५०४ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १५५१२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १४६३३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. ८७९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १७२ चमू आणि १२४ सुपरवायझर १२७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-९, आमगाव तालुका-२३, सालेकसा तालुका-१३, देवरी तालुका-२२, सडक/अर्जुनी-१२, गोरेगाव तालुका-१५, तिरोडा तालुका-३० आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-३ असे एकूण १२७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
00000





