40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ वाघाच्या हल्ल्यात मृत्यू; कुटुंबाला आर्थिक मदत

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू; कुटुंबाला आर्थिक मदत

0
4

blank

गोरेगाव,दि.०७ : तालुक्याच्या कलपाथरी येथील शेतकरी डुलेश्वर संतोष खरकाटे (वय ३५) हे शुक्रवारी (ता. ५) सकाळी साडेसातच्या सुमारास वनपरिसरात बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. दरम्यान,वनविभागाच्यावतीने पीडित कुटुंबास आर्थिक मदतीचा धनादेश जि.प.सभापती डाॅ.लक्ष्मण भगत व वनपरिक्षेत्र अधिकारी भगत यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत माजी सभापती मनोज बोपचे, उपसभापती रामेश्वर महारवाडे, फनिंद्र पटले, सोमेश्वर रहांगडाले, लालचंद चव्हाण, बाबा बोपचे, किशोर मेश्राम, रवी पटले यांनी पीडित कुटुंबातील सदस्याकडे सुपूर्द केली.
डुलेश्वर खरकाटे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारीदेखील सकाळी दुचाकीने गावालगतच्या जंगल भागात बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. परंतु, बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्य व गावकऱ्यांनी डुलेश्वर खरकाटे यांचा शोध घेतला असता, जंगल परिसरात दुचाकी आढळून आली. फरफटत नेल्याचे चिन्ह दिसून आल्याने त्या मागोमाग पाहणी केली असता एका झुडपात डुलेश्वर हे मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी तत्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत कार्यकर्त्यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबास पोहोचती केली.

blank