
यवतमाळ,दि.14. दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार अल्लु अर्जुनने आज अचानकपणे जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यास भेट दिली. एव्हणा त्याने अभयारण्यात जंगल सफारीचा आनंदही घेतला. विषेश म्हणजे जंगल सफारी दरम्यान वाघांचे दर्शन झाल्याने अल्लु अर्जुनने समाधान व्यक्त केले.
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे. हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८. ६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे. उंच डोंगराळ व द-या खो-याचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात. तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वेगवेगळे जंगली पशु पक्षी यांचा नेहमी वास असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. विषेश म्हणजे टिपेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांचा वावर असल्याने हमखास वाघ्र दर्शन होत असल्याने देश विदेशातुनही मोठ्याप्रमाणात पर्यटक येथे भेट देतात. तर अवणी वाघीनीमूळे टिपेश्वर अभयारण्य चर्चैत आले आहे.त्यानंतर टिपेश्वर अभयारण्याची संपुर्ण जगात ओखळ निर्माण झाली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांनी देखिल टिपेश्वर भेट दिली आहे. दरम्यान आज तेलंगाणा, आंद्रप्रदेश, तसेच साउथ भाषांच्या चित्रपटात काम करुन आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या ह्रद्रयात स्थान मिळविलेला सुपर अॅक्शन हिरो अल्लु अर्जुन १३ सप्टेंबरला अचानक टिपेश्वर अभयारण्यामध्ये भेट दिली. तो खास करुन अदिलाबाद येथुन टिपेश्वरमध्ये जंगल सफारी साठी आला होता. सुपरस्टार अल्लु अर्जुन टिपेश्वरमध्ये आल्याची माहिती सुना तसेच इतर परिसरात वा-यासारख्या पसरली. केळापुर, घाटंजी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सुन्ना गेट पुढे गर्दी केली. विषेश म्हणजे जंगल सफारीत अल्लु अर्जुनला विविध प्राण्यांचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे.





