
भंडारा,दि.28ः-भंडारा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्ष गीताताई कापगते यांचे आज(दि.28) निधन झाले.त्यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टी महिलाआघाडीला मोठा फटका बसला आहे.गीताताई कापगते यांनी महिला आघाडीचे पद सांभाळतानाच पक्षनिष्ठा आणि पक्षाचा प्रचार गावखेड्यापर्यंतच्या महिलामध्ये पोचविण्याचे काम केले आहे.





