43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय राज्यसभेकरीता राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेकरीता राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
82

blank

मुंबई/गोंदिया,दि.०८ः राज्यसभेच्या 26 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळी 11.30 वाजता राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल,खासदार पार्थ पवार,खासदार सुनील तटकरे,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ,मंत्री दिलीप वळसे पाटील ,गोंदियाचे पालकमंत्री ना.इंद्रनील नाईकजी,भाजपचे नेते व मंत्री आशिष शेलार,शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार समीर भुजबळ, आमदार संजय खोडके,आमदार राजकुमार बडोलें,आमदार राजूभाऊ कारेमोरे व महायुतीचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

blank